चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

By admin | Published: December 23, 2016 12:17 AM2016-12-23T00:17:15+5:302016-12-23T00:17:15+5:30

व्यवसायावर विपरीत परिणाम : शेतकऱ्यांसाठी औजारांच्या गरजा पूर्ण करताना पैशांमुळे अडचणी, औजारांची मागणी घटली

Due to the shortage of money, the world on the road is in double trouble! | चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

चलन टंचाईमुळे रस्त्यावरचा संसार अडकला दुहेरी संकटात !

Next

विक्रम पाटील --- करंजफेण --रस्त्यावरचं जगणं आमचं जशी तव्यावर करपते भाकरी। टिचभर खळगी भरण्यासाठी करतो मरणापर्यंत चाकरी।। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅस सिलिंडर, मायक्रो ओव्हनचा सगळीकडे वापर होत असला तरी भात्यावर जेवण बनवून खाणाऱ्या घिसाडी कुटुंबातील लोकांची परवड अजून संपलेलीदिसत नाही. मिळेल त्या ठिकाणी थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता बस्थान मांडून उघड्यावर संसार मांडलेले दृश्य पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये दृष्टिक्षेपात पडत आहे.शासन निरनिराळ्या योजना राबवून नागरिकांना समान पातळीवर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना दुष्काळ व अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील आर्थिक संकटात सापडलेल्या घिसाडी समाजातील लोकांना गावोगावी भटकंती करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी शेती औजारे बनवून देऊन आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. गवत कापणी व उसाचा हंगाम लक्षात घेऊन या कुटुंबांचे पाय कोल्हापूर जिल्ह्याकडे वळतात. शेतकऱ्यांना विळा, कुऱ्हाड, कोयता, नांगर इ. औजारे बनवून दिल्यास त्या मोबल्यात त्यांना रोख पैसे अगर धान्याच्या रूपात मोबदला मिळतो. त्यामुळे पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये या समाजातील अनेक कुटुंबे दिसत आहेत. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी, सद्य:स्थितीला चलन तुटवड्याचा त्यांच्या व्यवसायावर विपरुीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. ही कुटुंबे शेती औजारे बनवून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करीत असले तरी गावाकडील दुष्काळ व चलन टंचाईमुळे त्यांचा व्यवसाय दुहेरी संकटात सापडला आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेती औजारांना मागणी कमी होऊ लागल्यामुळे या व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे.या लोकांच्या नियमितच्या भटकंतीमुळे त्यांच्या लहान मुलांना शाळेतील धडे गिरविणे म्हणजे एक स्वप्नच बनून राहते. राहत्या गावी कोणी जवळचा नातेवाईक असेल, तर तेथे राहून ती मुले जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतात. हे शिक्षण म्हणजे त्यांचे ग्रॅज्युएटच म्हणावे लागेल. अन्यथा या समाजातील मुले आपल्या वाडवडिलार्जित पारंपरिक व्यवसायात रमतात.तरी अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे.


गावाकडे पाऊस कमी होत असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे मुलांना घेऊनच विंचवाच्या संसारासारखं फिरावं लागतं. त्यामुळे आमची मुले अडाणी राहू लागली आहेत, तरी शासनाने आमच्या मुलांना सरकारी वसतिगृहात शिक्षणासाठी सामील करून घ्यावे व आर्थिक मदत करावी.
- अमोल सोळंके , घिसाडी व्यावसायिक

Web Title: Due to the shortage of money, the world on the road is in double trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.