पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २७ मार्गांवर एस.टी सेवा बंद, १० लाखांचे उत्पन्न बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:49 PM2023-07-25T17:49:34+5:302023-07-25T17:49:49+5:30

१७,८०० किलोमीटरचा प्रवास करावा लागला रद्द

Due to flood situation ST services stopped on 27 routes in Kolhapur district, loss of income of 10 lakhs | पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २७ मार्गांवर एस.टी सेवा बंद, १० लाखांचे उत्पन्न बुडाले

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २७ मार्गांवर एस.टी सेवा बंद, १० लाखांचे उत्पन्न बुडाले

googlenewsNext

कोल्हापूर : संततधार वृष्टीचा फटका एसटी बस सेवेला बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २७ मार्गांवरील सेवा पूर्णत: बंद झाली आहे. तर ३ मार्गांवर पर्यायी मार्गाचा अवलंब करीत सेवा पुरविली जात आहे, अशी माहिती एसटीच्या कोल्हापूर विभागातर्फे देण्यात आली.

कोल्हापूर विभागातील सर्व १२ आगारांतील सेवा अतिवृष्टीमध्ये बाधित आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही होत आहे. कोल्हापूर आगारातून पणजी, चंदगड, अनुस्करा, संभाजीनगर आगारातून पडसाळी, गोतेवाडी, गगनबावडा, गडहिंग्लजमधून चंदगड, आजगोळी, नेसरी, गारगोटीतून आजरा, मलकापूरमधून गावडी, चंदगड आगारातून बेळगाव, हेरे, कानुर, बुजवडे, कोल्हापूर, कागलमधून मुरगुड, पणजी, राधानगरीतून निपाणी, गगनबावड्यातून कोल्हापूर तर आजरा आगारातून आजरा ते चंदगड, दाभिल, किटवडे, बेळगाव, गडहिंग्लज, कोवाड आदी मार्गांवरील एसटी सेवा बंद आहे. 

तसेच इचलकरंजी आगारातून कुरूंदवाडला जाणारी बस लाट मार्गे सुरू आहे. गारगोटी आगाराची निपाणी बससेवा चिमगांव मार्गे तर आजरा आगाराची आजरा ते साळगांव बस सोहाळे मार्गे सुरू आहे. कुरुंदवाड आगारातून पणजी बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे दोन दिवसांत दहा लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

दोन दिवसांतील नुकसान असे-

शनिवारी (दि. २२) एकूण रद्द किलोमीटर- १७,८००
बुडालेले उत्पन्न - ५ लाख ३ हजार २०६ रुपये
रविवारी (दि. २३) एकूण रद्द किलोमीटर - २१,३३२
बुडालेले उत्पन्न : ५ लाख ८४ हजार ७१०

Web Title: Due to flood situation ST services stopped on 27 routes in Kolhapur district, loss of income of 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.