जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:19 PM2023-03-10T19:19:23+5:302023-03-10T19:19:50+5:30

अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल

Due to the lack of public support the government is going ahead with the elections says Kishori Pednekar | जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर

जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर

googlenewsNext

सदाशिव मोरे

आजरा : घटनाबाह्य सरकार महानगरपालिका व जि.प.च्या निवडणुका काही तरी कारण दाखवून पुढे ढकलत आहे. सरकारने निवडणुका घेऊन दाखवाव्यात जनता त्यांची मूळ जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका पुढे ढकलणे ही लोकशाहीची शोकांतिका व संविधानाचा अपमान आहे. अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल अशी अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर व शिवसेनेच्या (ठाकरे गट)  नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. त्या पेद्रेवाडी (ता. आजरा)  येथे कार्यक्रमासाठी आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह व पक्ष काढून घेतला असला तरी ज्यांनी काढून दिलाय ते निवडणूक आयोग अनधिकृत  असल्याचे न्यायालयाने सांगून चपराक मारली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला पक्ष व चिन्हाबाबतचा  निर्णयही आम्ही मानायला तयार नाही. घटनाबाह्य सरकारकडून सुरु असलेल्या धुळवडीला त्याचपद्धतीने उत्तर दिले जाईल. जनाधार गमाविल्यामुळे सरकारकडून  चिन्हाव्यतिरिक्त निवडणुका घेवून महानगरपालिका व जि.प.च्या निवडणूका पुढे ढकलत आहे. निवडणुका कितीही पुढे ढकला जनता तुम्हाला मूळ जागेवर आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. 

तीन-तीन वर्षे प्रशासक ठेवल्यामुळे नागरिकांनी जायचे कुणाकडे असा सवाल करीत सरकारने योजनांची नुसती धुळवड उडवली आहे असाही आरोप केला. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय संविधान व लोकशाहीला धरून देईल असे अपेक्षा आहे. केदारी रेडेकर व शिवसेनेची नाळ जोडली आहे. वडिलांनी जे शिवसेनेत कमाविले आहे ते पुढे नेण्याची जबाबदारी युवा नेते अनिरुद्ध रेडेकर यांच्यावर आहे. ते ठाकरे शिवसेनेसोबत राहून कोल्हापूर व मुंबईत शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील असेही पेडणेकर यांनी सांगितले.

Web Title: Due to the lack of public support the government is going ahead with the elections says Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.