परीक्षेत डमी ते बनावट नोटांचा निर्माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:40+5:302021-08-15T04:25:40+5:30

कोपार्डे : बनावट नोटाप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला अंबाजी सुळेकरचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. कधीकाळी शाळेत हुशार ...

Dummy to counterfeit note maker in the test | परीक्षेत डमी ते बनावट नोटांचा निर्माता

परीक्षेत डमी ते बनावट नोटांचा निर्माता

Next

कोपार्डे : बनावट नोटाप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला अंबाजी सुळेकरचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. कधीकाळी शाळेत हुशार असणारा अंबाजी घरची परिस्थिती बेताची असल्याने झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने वाममार्गाला लागला. परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणूनही तो बसू लागला. मात्र, त्यासाठी बनवाव्या लागणाऱ्या बनावट कागदपत्रांचा खर्च अंबाजीला पेलवत नसल्याने त्याने स्वत:च बनावट कागदपत्रे बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्याची ही बनवेगिरी थेट बनावट नोटा बनविण्यापर्यंत गेली. यातून थेट कर्नाटकमधील टोळीलाच वेठीस धरून यंत्रणा राबवायला आंबाजीने आपले कसब लावले. करवीर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात १२ वाड्या वसल्या आहेत. यातील एक पासार्डे हे एक गाव आहे. संपूर्ण शेती जिरायती आणि डोंगराळ असल्याने कुटुंबाचा आर्थिक गरजा भागवण्यासाठी येथील लोकांना बांधकाम सेंट्रिंग व ऊसतोड मजुरी ही कष्टाची कामे करण्यासाठी जावे लागते. पण यातून कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यापलीकडे आर्थिक प्रगती होत नसल्याने आंबाजीची पावले वाम मार्गाकडे वळली.

शाळेत अतिशय हुशार असल्याने अंबाजीला दुसऱ्याच्या नावावर डमी बसणे यातून पैसे मिळत होते. मात्र, डमीसाठी लागणारी बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी पैसे खर्च होत असल्याने त्याने स्वत:च कोपार्डे येथील सांगरुळ फाट्यावर रबरी शिक्के झेरॉक्सची शॉपी टाकली. यातून बनावट क्रीडा, शैक्षणिक व इतर दस्तऐवज तयार होऊ लागले. बनावट महसुली कागदपत्रे तयार करण्यात आंबाजीचा हातखंडा असल्याने पाहिजे तेवढे पैसे देऊन गरजवंत आपला कार्यभाग साधत होते.

यातून त्याचा बनावट नोटा तयार करणाऱ्या कर्नाटकातील टोळीशी संपर्क आला प्रथम त्यांनी आंबाजीचा बनावट पोलिसांचा वापर करून ४ लाखांना लुटले. आंबाजीने त्यांनी वापरलेल्या युक्तीचाा त्यांच्यावरच वापर करून बनावट नोटा तयार करण्याचा फॉर्म्युला घेतला. आणि बनावट लाखो रुपये बाजारात आणण्याचा कट केला. पण मशीननेच त्याच्या ९ बनावटगिरीचे भिंंग फोडले.

चौकट : बनावट कागदपत्रांद्वारे अनेकांना नोकऱ्या

बनावट नोटांचा मास्टरमाइंड पासार्डेचा असल्याचे पोलीस कारवाईत निष्पन्न झाल्यानंतर कुंभी कासारी परिसरातील पेट्रोल पंप चालक, हॉटेल व्यावसायिक, बँका पतसंस्था किरकोळ व्यापारी चांगलेच हडबडले. कारण यातील बहुतांश जणांकडे बनावट नोटा आल्या होत्या. पण त्या कोणी दिल्या आणि तक्रार केली तर पोलिसी ससेमिरा लागण्याच्या भीतीपोटी सर्वांनीच तोंडावर बोट ठेवले. आंबाजीने अनेकांना बनावट शैक्षणिक व क्रीडा प्रमाणपत्र दिली आहेत. त्यातून अनेकांना नोकऱ्या मिळाल्याची चर्चा आहे. बनावट महसूल कागपत्राद्वारे अनेकांनी आपला कार्यभाग साधून घेतला आहे.

Web Title: Dummy to counterfeit note maker in the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.