दुर्गेश पवार टोळीतील १२ जणांना अखेर ‘मोक्का’

By admin | Published: July 30, 2016 12:27 AM2016-07-30T00:27:50+5:302016-07-30T00:31:30+5:30

पोलिसप्रमुखांचा दणका : कळंबा कारागृहातून अटक करणार; गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्याखाली कारवाई करणार

Durgesh Pawar, 12 people in the gang finally get 'Mokka' | दुर्गेश पवार टोळीतील १२ जणांना अखेर ‘मोक्का’

दुर्गेश पवार टोळीतील १२ जणांना अखेर ‘मोक्का’

Next

सांगली : येथील गोकुळनगरमध्ये गुंड रवींद्र कांबळे याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दुर्गेश पवार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या टोळीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून ‘मोक्का’च्या गुन्ह्यात लवकरच अटक केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
दुर्गेश नागाप्पा पवार (वय ३७), प्रशांत ऊर्फ परशा नागाप्पा पवार (३१), प्रशांत ऊर्फ परसू दुर्गाप्पा पवार (२६), नागेश ऊर्फ काळू दुर्गाप्पा पवार (२४), अशोक बाळाराम माकडवाले-जुधळे (३१), पप्या ऊर्फ राकेश शंकर दुधाळ (२६), विकास ऊर्फ आप्पा भीमाप्पा कांबळे (२२), गणेश रामाप्पा ऐवळे (२८), मोन्या ऊर्फ विशाल ऊर्फ यल्लाप्पा बापू पवार (३६), रवी ऊर्फ अशोक मसू पवार (२०), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (२०), मारुती मत्ताप्पा पवार (३३, सर्व रा. वडर कॉलनी परिसर, सांगली) अशी मोक्का लागलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत. दुर्गेश पवार व प्रशांत ऊर्फ परशा पवार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी चार, तर प्रशांत ऊर्फ परसू पवार व नागेश पवार यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीतील अन्य आठजण कांबळेच्या खूनप्रकरणी पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत.
शिंदे म्हणाले, मृत रवींद्र कांबळे हा गुंड म्हमद्या नदाफ टोळीचा सदस्य होता. त्यांनी अनेकदा शहरात एकत्रित गुन्हे केले आहेत. २००९ मध्ये म्हमद्याने (पान १२ वर)


...ही तर सुरुवात : दत्तात्रय शिंदे
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पत्रकारांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी कामाची दिशा स्पष्ट करून, ती बोलण्यापेक्षा
कृतीतून दिसेल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुर्गेश पवार टोळीला मोक्का लावून कारवाईचा दणका दिला आहे. ते म्हणाले, यापुढे शहरात असो अथवा जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या रेकॉर्डवर आल्या, तर त्यांना सोडणार नाही. ही तर सुरुवात आहे. जेव्हा-जेव्हा गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढतील, तेव्हा त्यांच्याविरुद्ध
मोक्का तसेच झोपडपट्टीदादा कायद्याचे हत्यार उपसले जाईल. एकाही टोळीला सक्रिय होऊ देणार नाही.
दुर्गेश पवार याच्यावर भरदिवसा खुनी हल्ला केला होता. तेव्हापासून म्हमद्या व दुर्गेश पवार टोळीत संघर्ष सुरू होता. रवींद्र कांबळे व दुर्गेश पवार टोळीची गोकुळनगरमध्ये नेहमी उठ-बस असायची. याठिकाणी वर्चस्व कोणाचे? या वादातून दुर्गेश पवारने ४ जुलैला साथीदारांच्या मदतीने गोकुळनगरमध्ये रवींद्रचा दगडाने ठेचून खून केला आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा बेकायदेशीर गुन्हेगारी कारवाया केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत दुर्गेश व परशा पवार यांच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांत दोनपेक्षा जादावेळा न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले आहे. यामध्ये त्यांना तीन वर्षांपेक्षा जादा शिक्षा होऊ शकते, अशा गुन्ह्यांचे दोषारोपपत्र आहे.
शिंदे म्हणाले, दुर्गेश पवार टोळीने गोकुळनगर, तसेच म्हमद्याचे वास्तव्य असलेल्या संजयनगरमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांच्या पडद्याआड राहून संघटित गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. यामध्ये आर्थिक फायदा मिळविण्याचा त्यांचा उद्देश होता. रवींद्र कांबळेच्या खुनामुळे ते चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे, निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार महानिरीक्षकांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक सुहास बावचे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक बाजीराव पाटील, संजयनगरचे प्रदीपकुमार जाधव उपस्थित होते.

...ही तर सुरुवात : दत्तात्रय शिंदे
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पत्रकारांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी कामाची दिशा स्पष्ट करून, ती बोलण्यापेक्षा
कृतीतून दिसेल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुर्गेश पवार टोळीला मोक्का लावून कारवाईचा दणका दिला आहे. ते म्हणाले, यापुढे शहरात असो अथवा जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या रेकॉर्डवर आल्या, तर त्यांना सोडणार नाही. ही तर सुरुवात आहे. जेव्हा-जेव्हा गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढतील, तेव्हा त्यांच्याविरुद्ध
मोक्का तसेच झोपडपट्टीदादा कायद्याचे हत्यार उपसले जाईल. एकाही टोळीला सक्रिय होऊ देणार नाही.

Web Title: Durgesh Pawar, 12 people in the gang finally get 'Mokka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.