सणासुदीच्या काळात, तरी रेल्वेची ‘स्पेशल’लुट थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:59+5:302021-09-08T04:30:59+5:30
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन कोल्हापूर-तिरूपती कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्सप्रेस) कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्सप्रेस) कोल्हापूर-अहमदाबाद कोल्हापूर- दिल्ली कोल्हापूर-नागपूर कोल्हापूर-धनबाद कोल्हापूर-गोंदिया दुप्पट ...
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
कोल्हापूर-तिरूपती
कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्सप्रेस)
कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्सप्रेस)
कोल्हापूर-अहमदाबाद
कोल्हापूर- दिल्ली
कोल्हापूर-नागपूर
कोल्हापूर-धनबाद
कोल्हापूर-गोंदिया
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
गेल्या दोन महिन्यांपासून टप्प्याटप्याने या स्पेशल नावाने रेल्वे सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे तिकीट आरक्षित असेल, तरच प्रवास करता येईल, अशी अट घातली आहे. कोल्हापुरातून पॅसेंजर रेल्वे अद्याप सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करायचे असा सवाल प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार
पॅसेंजरचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे होते. मात्र, या रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे आणि पॅसेंजर रेल्वे कधी ‘अनलॉक’ होणार अशी विचारणा प्रवासी करत आहेत.
‘स्पेशल’भाडे कसे परवडणार?
लॉकडाऊन पूर्वी रेल्वेने जयसिंगपूरला जाण्यासाठी ३० रूपये तिकीट होते. आता विशेष रेल्वेने तिकीट आरक्षित करून जाण्यासाठी ८० रूपये मोजावे लागत आहेत. त्यात प्रवाशांचे श्रम आणि वेळ वाया जात आहे. रेल्वे विभागाने पॅसेंजर, जनरल डब्बे सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.
-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती.
स्पेशल ट्रेनचा तिकीट दर अधिक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. मजूर, सर्वसामान्यांना प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे. त्याचा विचार करून रेल्वेने तिकीट दर कमी करावा.
-किशोर भोरावत, सदस्य, मिरज स्थानक रेल्वे सल्लागार समिती.
070921\07kol_5_07092021_5.jpg
डमी (०७०९२०२१-कोल-डमी ११४२)