विधायक कामासाठी दत्तचा नेहमीच पुढाकार : गणपतराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:25+5:302021-09-16T04:29:25+5:30
शिरोळ : कोरोना महामारीच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वार्षिक शुल्कामध्ये सवलत ...
शिरोळ : कोरोना महामारीच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वार्षिक शुल्कामध्ये सवलत दिली जाईल. तसेच आगामी काळात रोटरीच्या सहकार्याने कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी मोठे शिबिर आयोजित करून त्याचा फायदा रुग्णांना होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशा विधायक कामासाठी दत्त उद्योग समूह नेहमीच पुढाकार घेईल, अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती, अभियंता दिनानिमित्त शिरोळ येथील रोटरी क्लब, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स हॉस्पिटल सांगली आणि श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजच्यावतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आणि अभियंत्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये पार पडला. यावेळी दत्तचे अध्यक्ष पाटील यांच्याहस्ते अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दीपक ढवळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अंबादास नानिवडेकर, डॉ. सुहास जोशी, मल्लिकार्जुन बडे, रुस्तम मुजावर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक कोळेकर, विठ्ठल पाटील, संजय गावडे, प्राचार्य प्रेमसागर पाटील, उपप्राचार्य निळकंठ भोळे, धैर्यशील पाटील, शक्तिजित गुरव, शंकर कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १५०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे गणपतराव पाटील यांच्या हस्ते अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.