पोलीस महासंचालकपद देऊन २७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:19 AM2019-05-03T11:19:04+5:302019-05-03T11:20:26+5:30
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या २७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास ...
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या २७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या वर्धापनदिनी बुधवारी येथील अलंकार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके आणि पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पदक प्रदान करून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, असे सूचित केले. या कार्यक्रमास पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सहकुटुंब उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक सतीश माने, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे :
पोलीस निरीक्षक सुनील पाटील (राजारामपुरी पोलीस ठाणे), सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन अर्जुन पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाबूराव जाधव (नागरी हक्क संरक्षण), सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर आण्णाप्पा कोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरेश्वर पोटे, विष्णू रामचंद्र कांबळे (बिनतारी संदेश विभाग), पोलीस हवालदार श्रीकांत गणपतराव मोहिते, पोलीस हवालदार नंदकुमार रघुनाथ माने, अनिल गोविंद पाटील, यासीर बापूसाहेब शेख (नागरी हक्क संरक्षण), पोलीस हवालदार प्रशांत बाबूराव पाटील, पोलीस हवालदार झाकीर नूरमहम्मद इनामदार (दहशतवादी विरोधी पथक), पोलीस हवालदार विठ्ठल बाबूराव जरग, पोलीस हवालदार किरण वसंतराव कागलकर, पोलीस हवालदार रविंद्र बंडू गायकवाड, संभाजी कृष्णा भोसले, हणमंत महादेव ढवळे, वैभव परिसनाथ दड्डीकर, आप्पासाहेब भीमाप्पा पालखे, विलास पांडुरंग किरोळकर, उमर फारुक नूरमहम्मद कुडची, राजेश टोपसिंग राठोड, पांडुरंग तुकाराम पाटील, किरण कृष्णा भोगण (दोघेही स्थानिक गुन्हे अन्वेषण), भीमगोंडा मारुती पाटील (पारपत्र शाखा), सचिन प्रताप खंडागळे (लक्ष्मीपुरी), आयुबखान अकबर मुल्ला (वाचक शाखा) यांचा समावेश आहे.