'राजर्षी शाहू फूड व्हॅन' उपक्रमासाठी डी.वाय. पाटील ग्रुपकडून गाडी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:59+5:302021-04-13T04:21:59+5:30

कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरीब व गरजवंत यांना पोहचविणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या 'राजर्षी शाहू ...

DY for 'Rajarshi Shahu Food Van' initiative. Car gift from Patil Group | 'राजर्षी शाहू फूड व्हॅन' उपक्रमासाठी डी.वाय. पाटील ग्रुपकडून गाडी भेट

'राजर्षी शाहू फूड व्हॅन' उपक्रमासाठी डी.वाय. पाटील ग्रुपकडून गाडी भेट

Next

कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरीब व गरजवंत यांना पोहचविणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या 'राजर्षी शाहू फूड व्हॅन' या उपक्रमासाठी डी.वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरच्यावतीने सोमवारी ईको व्हॅन गाडी भेट देण्यात आली. ग्रुपचे उपाध्यक्ष व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या गाडीच्या किल्ल्या मंडलिक यांना प्रदान करण्यात आल्या.

अन्न हे पूर्णब्रम्ह असून शिल्लक अन्नाची नासाडी रोखून ते योग्य माणसांपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम मंडलिक व त्यांचे सहकारी करत आहेत. पर्यावरण संतुलनाबरोबरच भुकेलेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण करण्याचे दुहेरी कार्य त्यांच्याकडून होत आहे. त्यांच्या कार्याचा अधिक विस्तार व्हावा या हेतूने ही व्हॅन डी.वाय. पाटील ग्रुपकडून भेट दिली असल्याचे ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले. या आदर्शवत उपक्रमासाठी भविष्यातही काही मदत लागल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मंगळावर पेठेत राहणारे प्रशांत अरविंद मंडलिक हे शिल्लक राहणारे अन्न गोळा करून गरिबांना पोहचवण्याचे कार्य निस्पृह भावनेने करत आहेत. त्यासाठी अगदी रात्री उशिरापर्यतही त्यांची धडपड सुरू असते. आमदार ऋतुराज पाटील यांना या उपक्रमाची माहिती मिळताच या सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेत डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने 'फूड व्हॅन' देण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार सोमवारी या ईको व्हॅनच्या किल्ल्या प्रशांत मंडलिक यांना प्रदान करण्यात आल्या.

यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम, संशोधन संचालक डॉ. सी.डी. लोखंडे, उपकुलसचिव संजय जाधव, मेडिकल बायोटेक्नोलॉजी विभाग प्रमुख डॉ. मोहन करुपाइल आदी उपस्थित होते.

फोटो : १२ व्हॅन भेट

ओळी कसबा बावडा: 'राजर्षी शाहू फूड व्हॅन' या सामजिक उपक्रमासाठी डी.वाय. पाटील ग्रुपच्यावतीने इको व्हॅन प्रदान करताना आमदार ऋतुराज पाटील.

Web Title: DY for 'Rajarshi Shahu Food Van' initiative. Car gift from Patil Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.