डीवायपी वेलनेसची ॲब्स जिम उद्यापासून पुन्हा सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:50+5:302020-12-06T04:24:50+5:30
कसबा बावडा : डी. वाय. पी. वेलनेस प्रा. लि. कोल्हापूरची ॲब्स जिम उद्या, सोमवारपासून नव्या रूपात पुन्हा ...
कसबा बावडा : डी. वाय. पी. वेलनेस प्रा. लि. कोल्हापूरची ॲब्स जिम उद्या, सोमवारपासून नव्या रूपात पुन्हा कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. विस्तीर्ण जलतरण तलाव व पाच स्वतंत्र स्टुडिओ असलेली व पंचतारांकित सुविधा देणारी ऍब्स ही कोल्हापुरातील एकमेव जिम आहे. डी. वाय. पी. वेलनेस प्रा. लि.ने एबीएस फिटनेस व वेलनेस क्लबच्या सहकार्याने चार वर्षांपूर्वी एबीएस फिटनेस अँड वेलनेस क्लबची कोल्हापूरमध्ये स्थापना केली. हॉटेल सयाजी, लेव्हल २ , जुना पुणे - बंगलोर हायवे, कावळा नाका, कोल्हापूर येथील या जिमला सुरुवातीपासूनच कोल्हापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल १५ हजार चौरस फुटांवर विस्तारलेली व पंचतारांकित सुविधा देणारी कोल्हापूरमधील ही एकमेव जिम आहे. विस्तीर्ण जलतरण तलाव व पाच स्वतंत्र स्टुडिओ, आदी सुविधा डी. वाय. पी. वेलनेस प्रा. लि.च्या एबीएस जिममध्ये उपलब्ध आहेत. कोविड महामारीच्या काळात ही जिम १५ मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. सरकारच्या नव्या सूचनांनुसार सोशल डिस्टन्स व अन्य नियमांचे पालन करत नव्या रूपात अधिक सुविधांसह ही जिम उद्या, सोमवारपासून पुन्हा कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत ही जिम कार्यरत राहणार आहे. देशातील पहिला इनडोअर व्हीएफएक्स सायकलिंग स्टुडिओ उभारण्याचा मान याच जिमला मिळाला आहे. हाय इंटेन्सिटी फंक्शनल एक्स्प्रेस स्टुडिओमुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करणे शक्य होणार आहे. कार्डिओ मशिन्सने सुसज्ज वेट झोन त्याचबरोबर ग्रुप ॲक्टिव्हिटीसाठी स्टुडिओ येथे उपलब्ध आहे. ट्रिम सेक्शनच्या मदतीने वजन व फॅट घटविणे सोपे होणार आहे. त्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक, फ्री डाएट प्लॅन व बीएमआय सेक्शन सुविधा देण्यात आली आहे.