दुरवस्थेला अकार्यक्षम मंडळी जबाबदार

By admin | Published: April 18, 2016 12:09 AM2016-04-18T00:09:32+5:302016-04-18T01:09:39+5:30

मेघराज राजेभोसले : कोल्हापूर, पुणे, मुंबईत २४ एप्रिलला मतदान

Dysfunctional church responsible | दुरवस्थेला अकार्यक्षम मंडळी जबाबदार

दुरवस्थेला अकार्यक्षम मंडळी जबाबदार

Next

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. मतदान दि. २४ एप्रिलला कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे होणार आहे. या निवडणुकीत एकूण नऊ पॅनेलसह १२० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ची भूमिका रविवारी सर्व सभासदांपुढे मांडली आहे. याबाबत स्वत: मेघराज राजेभोसले यांच्याशी साधलेला संवाद
प्रश्न : महामंडळाचे इतके सभासद असूनही केवळ ३९०४ जणांनाच मतदानाचा अधिकार का ?
उत्तर : महामंडळामध्ये जवळजवळ २६ हजार सभासद आहेत. त्यापैकी केवळ ‘अ’ वर्ग ज्यांना मतदानाचा अधिकार आहेत, ते केवळ ३९०४ जणच आहेत. कारण विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांच्यासह माजी अध्यक्ष विजय कोंडके, प्रसाद सुर्वे यांना जादा सभासद मतदानाकरीता पात्र झाले तर आपल्या खुर्चीला धक्का लागेल असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मर्जीतीलच काही सभासदांना ‘अ’ वर्गात घेतले.
प्रश्न : महामंडळाची कशी व कोणती दुरावस्था झाली आहे ?
उत्तर : कोणत्याही विश्वस्त संस्थेत अध्यक्ष, सभासद जेव्हा मालक झाल्यासारखे वागू लागतात, तेव्हा त्या संस्थेचे मातेरे होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळही दुदैवाने याला अपवाद ठरले नाही. मोठ-मोठी उड्डाणे घेणाऱ्या या संस्थेच्या मागच्या पंचवार्षिक कालावधीत अध्यक्षांनी स्वत: ची तुंबडी भरली. पाच वर्षांत तीन अध्यक्ष आणि प्रत्येकाची तऱ्हा तीच, याची खाबुगिरी इतक्या टोकाला गेली की, अध्यक्षाला सभा अर्धवट सोडून रिक्षातून पळ काढावा लागला.
कार्यक्रमासाठी चित्रपट महामंडळाच्या ठेवी मोडणे आणि त्यातून अर्थिक गैरव्यवहार करणे असे प्रकार उघड होऊनही संबंधितांवर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रश्न : तुमच्या पॅनेलमधून कोणाला स्थान दिले आहे ?
उत्तर : सतीश रणदिवे, पितांबर काळे, अभिनेता सुशांत शेलार, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, धनाजी यमकर, निकीता मोघे, अमर मोरे, मधुकर देशपांडे, विजय खोचीकर, संजय ठुबे, शरद चव्हाण, चैत्राली डोंगरे, रणजित ऊर्फ बाळा जाधव यांना स्थान दिले आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभार करून ही मंडळी महामंडळाला उच्च स्थानावर नक्कीच नेतील. यासह कोल्हापुरातही चित्रनगरीच्या रूपाने लवकरच चित्रीकरणास सुरुवातही आम्हाला संधी दिल्यास सुरू करून हाताला काम नसलेल्या कामगारांना काम दिले जाईल.

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक --माझी भूमिका

Web Title: Dysfunctional church responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.