सभासदांच्या पाठबळावर नांदणी बँकेची गरूडझेप : आण्णासाहेब चकोते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:52+5:302021-02-24T04:26:52+5:30
नांदणी (ता. शिरोळ) येथील बँकेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे होते. ...
नांदणी (ता. शिरोळ) येथील बँकेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे होते. स्वागत संचालक सदाशिव बुबणे यांनी केले. यावेळी दिव्यांगांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच विद्यार्थिनी श्रावणी मगदूम हिच्यासह नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला तर ‘सर्वोत्कृष्ट शाखा’ म्हणून नांदणी, गांधीनगर व जयसिंगपूर येथील शाखांना गौरविण्यात आले.
अध्यक्ष लठ्ठे म्हणाले, अहवाल सालात बँकेने २०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. येणाऱ्या काळातही बँक आणखी प्रगतिपथावर राहील, असा विश्वास व्यक्त केला. नोटीस वाचन राजेंद्र कसलकर यांनी केले. यावेळी सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली.
सभेस बाळकृष्ण देशपांडे, महावीर चौगुले, सुरेश आरगे, आण्णासाहेब क्वाणे, विजय कोळी, सुरेश धुळासावंत, बाबासोा टरे, संजय वसवाडे, बापूसोा भगाटे, मोहन पाटील, डॉ. एस. डी. पाटील, बापूसोा नदाफ, शीतल देमापुरे, त्रिशला धुळासावंत यांच्यासह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन रुस्तुम मुजावर तर विद्यासागर बस्तवाडे यांनी आभार मानले.
फोटो - २३०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथील बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे यांनी मार्गदर्शन केले.