पृथ्वी माझी माता ! मी तिचा रक्षणकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:05 AM2019-04-24T00:05:30+5:302019-04-24T00:05:35+5:30

भारत पाटील ‘आरोग्य सौख्य नांदेल घराघरा! जर निरोगी असेल वसुंधरा!’ सजीव सृष्टी व समृद्ध निसर्गसंपत्ती असलेला सूर्यमालेतील ‘पृथ्वी’ हा ...

Earth is my mother! I am her savior | पृथ्वी माझी माता ! मी तिचा रक्षणकर्ता

पृथ्वी माझी माता ! मी तिचा रक्षणकर्ता

googlenewsNext

भारत पाटील
‘आरोग्य सौख्य नांदेल घराघरा! जर निरोगी असेल वसुंधरा!’ सजीव सृष्टी व समृद्ध निसर्गसंपत्ती असलेला सूर्यमालेतील ‘पृथ्वी’ हा एकमेव ग्रह आहे. हवा, पाणी, जंगले व विविध साधनसंपत्ती निसर्गाने आपणाला भरभरून दिली आहे; परंतु आपण मानवाने प्रगतीच्या नावाखाली राक्षसी महत्त्वाकांक्षेचा अंगीकार केल्यामुळे निसर्गाची व पर्यावरणाची आपण सर्वांनी खूप मोठी हानी केली आहे. आपल्या डोळ्यांवर विकासाची धुंदी चढली आहे. या धुंदीमध्ये आपण हवा, पाणी व जमीन यांसह सर्व निसर्गचक्रामध्ये खूप हस्तक्षेप केल्यामुळे आज पर्यावरणाचा पूर्णत: समतोल ढासळला आहे. यामुळे जागतिक तपमान वाढ, प्रदूषण व नैसर्गिक आपत्ती यांमुळे पृथ्वी व त्यावर राहणारी सगळी सजीव सृष्टीच धोक्यात आली आहे.
१९६९ मध्ये कॅलिफॉनिर्या येथील सांता बार्बरा समुद्रात तेल गळती झाल्यामुळे पाण्यावर तवंग आला होता. यामुळे मोठे प्रदूषण झाले होते. यामुळे समुद्रातील जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात नाश पावली होती. या प्रदूषण आपत्तीमुळे लोकांमध्ये खूप नाराजी व घबराट पसरली होती. या गंभीर समस्येवर लोकांचे प्रबोधन करावे, लोकजागर करावा, यासाठी अमेरिकेतील विन्स्कोन्सिन राज्याचे सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी पहिल्यांदा २२ एप्रिल १९७0 रोजी ‘वसुंधरा दिन’ साजरा केला. त्यावेळी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी एं१३ँ ऊं८ ठी३६ङ्म१’ (एऊठ) या संस्थेची स्थापना केली. हवा, जमीन व पाणी निरोगी व स्वच्छ राहावे, शाश्वत व संतुलित पर्यावरण मानवाला मिळावे, यासाठी ही संस्था सतत काम करीत आहे. हवेतील ‘कार्बनचे उत्सर्जन व ओझोन वायूचा ºहास ही जागतिक तपमान वाढीची प्रमुख कारणे आहेत.’ यासाठी १९८५ मध्ये कार्बनची निर्मिती व उत्सर्जन याविषयी व्हिएन्ना येथील परिषदेमध्ये सर्व देशांमध्ये एक करार करण्यात आला. वाढत्या तापमानामुळे पूर्णत: निसर्गचक्रच बिघडले आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, ओला व सुका दुष्काळ, हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळले जातेय. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, ढगफुटी, महापूर, हवेचे, पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण ही संकटे निर्माण झाली आहेत. यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीबरोबरच पृथ्वीचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. भविष्यातील या संकटामुळे सर्व जग आता खडबडून जागे झाले आहे आणि यामुळेच १९९0 साली जगतील १४१ देशांतील जवळजवळ २0 कोटी लोक ‘वसुंधरादिना’मध्ये सहभागी झाले होते. टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करून फीू८ू’ी आणि फी४२ी ही नवीन संकल्पना समोर आली आहे. कार्बन, प्लास्टिक व प्रदूषण यावरती सखोल चर्चा सुरू झाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने १९९२ ला जागतिक वसुंधरा शिखर परिषद घेण्यात आली. यामध्ये जागतिक तपमान वाढ, पर्यावरण, पाणी, जंगल संपत्ती, प्रदूषण व हवामानातील होणारे बदल याविषयी गंभीर दखल घेण्यात आली. ‘४0 वा वसुंधरादिन’ हा चीनमधील बिन्जिग शहरात घेण्यात आला. त्यावेळी १९२ देश सहभागी झाले होते. त्यावेळी वनसंपदा, कार्बन क्रेडिट, कार्बन उत्सर्जन याचे मानवावर होणारे दुष्परिणाम व शुद्ध हवा, शुद्ध पाणी यावरती सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यातून ‘अ इ्र’’्रंल्ल अू३२ ङ्मा ॠ१ीील्ल’ या लोकचळवळीला चालना मिळाली. पृथ्वी वाचविली तरंच आपण जिवंत राहू, हे सत्य आता समजून आले आहे. ‘पृथ्वी माझी माता! मी तिचा रक्षण कर्ता!’ ही पवित्र भूमिका आपणाला साकारावी लागणार आहे. यासाठी पर्यावरण, प्रदूषण, वृक्षारोपण, जंगलतोड, पाण्याचे महत्त्व, वापर या बाबींवर प्रभावी कार्यक्रम राबविणे ही सर्वांच्या हिताचे गरजेचे बनले आहे.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)

Web Title: Earth is my mother! I am her savior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.