चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:03 PM2024-07-24T12:03:32+5:302024-07-24T12:03:54+5:30

शित्तुर वारुण : आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वारणावती येथील भूकंपमापन ...

Earthquake in Chandoli dam area, panic among citizens | चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

शित्तुर वारुण : आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. भूकंपामुळे कोणतीही वित्त वा जीवितहानी झाली नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाच्या पश्चिमेला ८ कि.मी वर होता अशी माहिती पाटबंधारे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली. तीव्रता कमी असली तरी पहाटेच्या शांततेत हा धक्का जाणवला त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

चांदोली धरणातून विसर्ग सुरु

वारणा (चांदोली) धरण ८२.५१ टक्के भरले असून काल, मंगळवारी धरणातून दोन हजार १५२ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६४८ क्युसेक असा एकूण तीन हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे ‘वारणा’, ‘कृष्णा’ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Earthquake in Chandoli dam area, panic among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.