बेळगावात उद्या महामेळाव्याचे आयोजन; खा. धैर्यशील माने यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 07:12 PM2022-12-18T19:12:19+5:302022-12-18T19:19:58+5:30

महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

eat Restraining order against Darisheel Mane, | बेळगावात उद्या महामेळाव्याचे आयोजन; खा. धैर्यशील माने यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश

बेळगावात उद्या महामेळाव्याचे आयोजन; खा. धैर्यशील माने यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश

Next

कोल्हापूर: महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेचे सदस्य अर्थात खासदार धैर्यशील माने हे बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या 19 डिसेंबर रोजी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित महामेळाव्याला उपस्थित राहण्यास येणार आहेत. त्यांच्याकडून प्रक्षोभक भाषण किंवा प्रक्षोभक व्यक्तव्य होण्याद्वारे भाषिक वैमनस्य निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्नाटकात राहणाऱ्या मराठी भाषिकांना भडकविण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात!

यासाठी बेळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नितेश के. पाटील यांनी सीआरपीसी 1973 कलम 144 (3) अन्वये खासदार धैर्यशील माने यांनी 19 डिसेंबर 2022 रोजी बेळगाव सीमेच्या आत प्रवेश करू नये, असा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

Web Title: eat Restraining order against Darisheel Mane,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.