दुग्ध क्रांतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:46+5:302021-06-02T04:19:46+5:30

सावरवाडी : जगभरात दूध व्यवसाय हा आर्थिक स्थैर्य प्राप्त करणारा ठरला आहे . दर्जेदार दूध उत्पादनातून नवे ...

Economic development of farmers due to dairy revolution | दुग्ध क्रांतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास

दुग्ध क्रांतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास

Next

सावरवाडी : जगभरात दूध व्यवसाय हा आर्थिक स्थैर्य प्राप्त करणारा ठरला आहे . दर्जेदार दूध उत्पादनातून नवे परिवर्तन घडत आहे. दुग्धक्रांतीमुळेच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडत असल्याचे प्रतिपादन गोकूळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आज (मंगळवारी) केले

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे जागतिक दूध दिनांचे औचित्य साधून छत्रपती शाहू दूध सहकारी संस्थेतर्फे आयोजित दूध उत्पादकांना मास्क व सॅनिटायझर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील होते.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणच्या काळात दूध व्यवसायामुळे अनेकांना आर्थिक आधार मिळाला आहे. दूध संकलन वेळी संस्थांनी शासनाच्या नियमांचे कडक पालन करणे गरजेचे असल्याचे सांगून विश्वासराव पाटील म्हणाले सोशल डिस्टन्सचा अवलंब करून दूध संकलन करावे

यावेळी संस्थेतर्फ दूध उत्पादक सभासदांना माक्स, सॅनिटायझर, यांचे वाटप गोकूळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, माधव पाटील, माजी सरपंच एस. के. पाटील, बलाभीम विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, तुकाराम पाटील, अशोक पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी सचिव संजय पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शेवटी के. वाय. पाटील यांनी आभार मानले. यावेळी सोशल डिस्टन्सचे कडक नियम पाळण्यात आले होते.

फोटो ओळ = शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे जागतिक दूध दिनांचे औचित्य साधून दूध उत्पादकांना गोकूळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते माक्स व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी, सचिन पाटील संजय पाटील, महादेव टिंगे, के. वाय. पाटील यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते.

Web Title: Economic development of farmers due to dairy revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.