सहकारामुळेच दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती : विश्वास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:12+5:302021-08-17T04:28:12+5:30
‘गोकुळ’च्या दूध प्रकल्प येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात ते बाेलत होते. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ध्वजारोहण संचालक बाबासाहेब ...
‘गोकुळ’च्या दूध प्रकल्प येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात ते बाेलत होते. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ध्वजारोहण संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते, गोगवे चिलिंग सेंटरमध्ये कर्णसिंह गायकवाड, गडहिंग्लज चिलिंग सेंटरवर अंजना रेडेकर, ‘बिद्री’ चिलिंग सेंटरवर रणजितसिंह पाटील, शिरोळ चिलिंग सेंटरवर डॉ. सुजित मिणचेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटवरवर बयाजी शेळके, ‘महालक्ष्मी‘ पशुखाद्य कारखाना येथे शशिकांत पाटील-चुयेकर, गडमुडशिंगी पशुखाद्य कारखाना येथे सहायक व्यवस्थापक प्रसाद मुजुमदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, डी. के. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’ दूध प्रकल्प येथे ध्वजारोहण अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (फोटो-१६०८२०२१-कोल-गोकुळ)