'देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 02:34 PM2019-10-16T14:34:00+5:302019-10-16T14:34:43+5:30

'अर्थशास्त्राचे नियम अतिशय कठोर आणि निष्ठूर असतात, ते कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाहीत'

Economy of the country will not roll in for at least three years -Yashwant Sinha | 'देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही'

'देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही'

googlenewsNext

कोल्हापूर: देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणा-या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पहिल्यांदा कोल्हापुरात आलेल्या यशवंत सिन्हा यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. प्रचारासाठी आलो नाही, हे स्पष्ट करुन अर्थशास्त्राचे नियम अतिशय कठोर आणि निष्ठूर असतात, ते कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाहीत, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला.

यशवंत सिन्हा म्हणाले, "देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८  आणि २00८ अशा तीन वेळा संकट आले. पण ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडीमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशातंर्गत असून सरकारच्य वैयक्तीक धोरणामुळे ओढवली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेच कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंताना फायदा झाला."

याचबरोबर, यशवंत सिन्हा म्हणाले, "एक लाख ३0 हजार कोटीची रक्कम कृषी आणि रिअल इस्टेटकडे वळवली असती तर आज जो विकासदर आणि बेरोजगारीने निचांक गाठला आहे, त्यात कांही प्रमाणात सुधारणा झाली असती. पण पंतप्रधानपदी बसलेल्या मोंदीना हे करायचेच नाही. त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत, त्यांची मते विचारात घेतली जात नाहीत.त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांना दोष देऊन उपयोग नाही. भीती असल्यामुळे आणि निर्णयाविषयी अज्ञान असल्यामुळे त्यांचे मंत्री काय वाटेल ते बरळत सुटले आहेत."

Web Title: Economy of the country will not roll in for at least three years -Yashwant Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.