शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारात अवतरली ‘कडकलक्ष्मी’
By Admin | Published: January 3, 2017 08:03 PM2017-01-03T20:03:25+5:302017-01-03T20:03:25+5:30
तिरिक्त शिक्षकांच्या सहाव्या वेतनाचा आदेश व्हावा. समायोजनाबाबत शिक्षण विभागाने ठोस कार्यवाही करावी, या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी
> संतोष मिठारी, आदित्य वेल्हाळ/ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 3 - अतिरिक्त शिक्षकांच्या सहाव्या वेतनाचा आदेश व्हावा. समायोजनाबाबत शिक्षण विभागाने ठोस कार्यवाही करावी, या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांनी मंगळवारी प्रतीकात्मक कडकलक्ष्मी आंदोलन केले.
संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी आंदोलनाच्या नवव्या दिवशी या ठिकाणी प्रतीकात्मक कडकलक्ष्मी आंदोलन करण्यात आले. त्यात अतिरिक्त शिक्षक एस. के. पाटील यांनी प्रतीकात्मक कडकलक्ष्मीची वेशभूषा करून सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते विज्ञान सल्लागार अशोक रणदिवे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मागण्या तसेच शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.