न्यायदंडाधिकाऱ्यांमुळे शिक्षा

By admin | Published: January 17, 2016 12:53 AM2016-01-17T00:53:17+5:302016-01-17T00:57:33+5:30

इचलकरंजीतील प्रकरण : १२ साक्षीदार फितूर, बलात्काऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

Education due to jurisdictions | न्यायदंडाधिकाऱ्यांमुळे शिक्षा

न्यायदंडाधिकाऱ्यांमुळे शिक्षा

Next

इचलकरंजी : १२ साक्षीदार फितूर होऊनही न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा जबाब ग्राह्य मानून येथील शाळकरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आजिम बाळासो मुल्ला (वय २४, रा. जवाहरनगर) याला दोषी ठरविले.
अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश आर. अस्मर यांनी शनिवारी मुल्ला याला दहा वर्षे सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे पीडित मुलगी व तिची आई या दोघींही फितूर झाल्या होत्या.
जवाहरनगर येथील हनुमाननगर परिसरात आजिम मुल्ला विवाहित असून, त्याला दोन अपत्ये आहेत. तो २०१३ मध्ये परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून घरी बोलावीत होता व घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करीत होता. या संदर्भात कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही देत होता. हा प्रकार ९ जून २०१३ रोजी उघडकीस आला. आजिम हा दोन महिने तिच्यावर बलात्कार करीत होता. शिवाजीनगर पोलिसांत या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आजिम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावरील दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते.
त्या दोषारोपपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली, तेव्हा त्यात तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अर्चना बोदडे यांच्यासह १७ साक्षीदार तपासले. यापैकी फिर्यादी (मुलीची आई), पीडित मुलगी यांच्यासह १२ साक्षीदार फितूर झाले. तरीही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. निंबाळकर यांच्यासमोर सीआरपीसी १६४ नुसार पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला होता. हा जबाब व निंबाळकर यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आजिम मुल्ला यास बलात्कार तसेच अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (६) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच ५० हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास एक वर्षे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील व्ही. जी. सरदेसाई यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Education due to jurisdictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.