कणेरीवाडीतील वृध्दाला शिक्षा

By admin | Published: June 30, 2017 04:17 PM2017-06-30T16:17:30+5:302017-06-30T16:17:30+5:30

पाच वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार

Education for the elderly in Kaneriwadi | कणेरीवाडीतील वृध्दाला शिक्षा

कणेरीवाडीतील वृध्दाला शिक्षा

Next



आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : शिवाजीनगर, कणेरीवाडी (ता. करवीर) येथील पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी शुक्रवारी वृध्दास पाच वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावला. आरोपी गोविंद बाळू घाडगे (वय ७४) असे त्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, पिडीत मुलींचे कुटूंबिय व आरोपी गोविंद घाडगे हे शेजारी राहतात. दि. १८ मार्च २०१४ रोजी दूपारी तीनच्या सुमारास या दोन मुली शाळेतून आल्यावर आत्याच्या घरासमोर खेळत होत्या. यावेळी घाडगे हा एकटाच घरी होता. त्याच्या नजरेस या दोन मुली खेळत असल्याचे दिसले. त्याने दोघींना आपल्या घरी बोलवून घेतले. माडीवर नेवून पोटमाळ्यावरील दोरी काढण्याचा बहाणा करीत त्याने दोघींवर लैंगिक अत्याचार केला. त्यातील एक मुलगी आईला सांगतो म्हणून पळत घरी आली. तर दूसरीला त्याने धरुन ठेवत मारहाण करीत कोणाला सांगू नको असे सांगितले. त्यामुळे ती तिथेच रडत बसली.

पहिली मुलगी रडत घरी आल्याने तिच्या आईने विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. तिच्यासह आई व अन्य नातेवाईक घाडगेच्या घरी गेले असता त्याने मी काहीही केले नसल्याचा कांगावा केला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी आरोपी घाडगे याला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोन्ही मुलीचा जबाब, शेजारी, मुलींची आई, आत्या यांचे जबाब महत्वाचे ठरले. आरोपीच्या दंडाची रक्कम दोन्ही मुलींच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: Education for the elderly in Kaneriwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.