समाजाच्या उन्नतीकरिता शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:48+5:302021-01-09T04:19:48+5:30

गणेशवाडी येथे शिवाजी विद्यानिकेतनमध्ये व्यायाम शाळेचे उदघाटन लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : समाजहिताबरोबर विज्ञाननिष्ठ समाजाच्या उन्नतीकरिता नव्या बदलत्या काळात ...

Education should be disseminated to the grassroots for the betterment of the society; | समाजाच्या उन्नतीकरिता शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा;

समाजाच्या उन्नतीकरिता शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा;

Next

गणेशवाडी येथे शिवाजी विद्यानिकेतनमध्ये व्यायाम शाळेचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : समाजहिताबरोबर विज्ञाननिष्ठ समाजाच्या उन्नतीकरिता नव्या बदलत्या काळात शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. पाटील यांनी केले.

गणेशवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यानिकेतनमध्ये व्यायामशाळा, हँडवॉश आदींच्या आयोजित उद्घाटन कार्यक्रमात प्राचार्य पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच भारती माने होत्या.

प्रारंभी व्यायामशाळा, हॅन्डवॉश स्टेशन आदींचे प्राचार्य पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. एम. एम. दीक्षित, एस. बी. लाड, अरुण देशमुख, आनंदा कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नामदेव यादव यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी यादव व नंदिनी चव्हाण यांनी केले. ज्ञानदेव यादव यांनी आभार मानले.

Web Title: Education should be disseminated to the grassroots for the betterment of the society;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.