लिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक :डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:55 PM2021-02-12T17:55:21+5:302021-02-12T17:57:28+5:30

Shivaji University Kolhapur- लिंग समानता प्रस्थापनेच्या दृष्टीने बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते यांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.

Effective use of technology is essential for gender equality: d. T. Shirke | लिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक :डी. टी. शिर्के

लिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक :डी. टी. शिर्के

googlenewsNext
ठळक मुद्देलिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक :डी. टी. शिर्के शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

कोल्हापूर : लिंग समानता प्रस्थापनेच्या दृष्टीने बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते यांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि एस. डी. महाविद्यालय, अलापुझ्झा (केरळ) यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यनव्वदोत्तरी कालखंडातील लिंग अभ्यास : तंत्रज्ञानात्मक बाबी व सक्षमीकरणाचे वास्तवह्ण या विषयावर आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. अध्यक्षस्थानी एस. डी. महाविद्यालयाचे व्यवस्थापक पी. कृष्ण कुमार होते.

आपण लिंगसमानताविषयक बाबींचा प्रसार, प्रचार प्रभावीपणे करू शकतो. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांसह तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देणारे पालक, शिक्षक यांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे महिला सबलीकरणाच्या चळवळीला नवे आयाम प्राप्त झाले असल्याचे पी. कृष्ण कुमार यांनी सांगितले.

या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, एस. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. उन्नीकृष्णा पिल्लाई, उपप्राचार्य डॉ. टी. आर. अनिल कुमार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी परिषदेच्या समन्वयक कार्थिका आर. यांनी स्वागत केले. एस. डी. महाविद्यालयाच्या इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. लीना पी. पै यांनी प्रास्ताविक केले. परिषदेच्या सचिव व बेटी बचाओ अभियानाच्या डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Effective use of technology is essential for gender equality: d. T. Shirke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.