तलाठ्यांचा दाखले वितरणावर बहिष्कार सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:43 PM2017-10-05T17:43:13+5:302017-10-05T17:47:20+5:30

विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकषांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. गुरुवारीही हा बहिष्कार कायम राहिला. त्याचा परिणाम होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

Efforts to boycott movement on distribution of tickets | तलाठ्यांचा दाखले वितरणावर बहिष्कार सुरुच

तलाठ्यांनी दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. त्याचा परिणाम होऊन गुरुवारीही नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

Next
ठळक मुद्देदाखले मिळत नसल्याने नागरिकांमधून संतप्त भावनातलाठ्यांचा आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा बहिष्कार दाखल्यांपुरता मर्यादितजिल्ह्यातील ५५४ तलाठी सहभागी

कोेल्हापूर : विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकषांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. गुरुवारीही हा बहिष्कार कायम राहिला. त्याचा परिणाम होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली.


या बहिष्कारामध्ये जिल्ह्यातील सुमारे ५५४ तलाठी सहभागी झाले आहेत. हा बहिष्कारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील दाखले वितरणाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

आवश्यकता असतानाही दाखले मिळत नसल्याने संतप्त भावनाही नागरिकांमधून उमटत आहेत; परंतु आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा तलाठ्यांनी घेतला आहे. दाखल्यांपुरता बहिष्कार मर्यादित असला तरी तलाठ्यांकडून महसूल यंत्रणेतील इतर कामकाज केले जात होते.

 

Web Title: Efforts to boycott movement on distribution of tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.