कोल्हापूरात अकरावीची प्रवेशप्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न, वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:02 PM2018-06-25T14:02:33+5:302018-06-25T14:08:41+5:30
अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात आल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) येथील कॉमर्स कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सोमवारी अर्धा तास बंद पाडली.
कोल्हापूर : अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात आल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) येथील कॉमर्स कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सोमवारी अर्धा तास बंद पाडली.
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशपत्रे मोफत द्यावीत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक शासन आणि प्रशासनाने करावी; अन्यथा प्रवेश प्रक्रिया थांबवून उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा या संघटनांनी दिला आहे.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी कॉमर्स कॉलेज येथील प्रवेश प्रक्रिया सुरु होताच समिती सदस्यांसमोर संघटनेच्या मागण्या सादर केल्या. यावेळी ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे आणि जिल्हा सचिव प्रशांत आंंबी यांच्याशी समिती सदस्यांशी वादावादी झाली. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ या वादामुळे प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली होती.
अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात येत आहे. या प्रवेशपत्रातून पूर्वी जमा झालेले सात लाख रुपये प्रशासनाकडे पडून आहेत. या पैशातून एक तर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मोफत द्यावीत; अन्यथा माफक शुल्कात जास्तीत जास्त २० रुपयांमध्ये द्यावीत. प्रवेश प्रक्रिया पारदर्शी व्हावी. त्यातील पैशांचा खेळ थांबवा. दहावीचा निकाल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. त्या प्रमाणात अनुदानित तुकड्या व जागा तसेच अकरावी आणि बारावीच्या तुकड्या वाढविणे गरजेचे होते; पण शासनाने विनाअनुदानित तुकड्या महाविद्यालयांना देऊन आपली जबाबदारी झटकली आहे.
समान गुण असणाऱ्यांना किंवा थोड्या गुणांचे अंतर असणाºयांपैकी काहीजणांना अनुदानित तुकडी, तर काहींना विनाअनुदानित तुकडी मिळते. विनाअनुदानित तुकडीत हजारो रुपये शुल्क आकारून गरिबांना लुटले जात आहे. मागील वर्षापासून जवळपास दीडपट शुल्क वाढविण्याचा घाट घातला जात आहे. ही शुल्कवाढ त्वरित मागे घेऊन विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी या संघटनांनी केली.
अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात आल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) येथील कॉमर्स कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सोमवारी अर्धा तास बंद पाडली.