देवर्डे-पारेवाडी रस्त्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:24+5:302021-02-17T04:29:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेरणोली : शेती व गावाच्या विकासाला चालना देणाऱ्या आजरा तालुक्यातील देवर्डे व पारेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्नशील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरणोली : शेती व गावाच्या विकासाला चालना देणाऱ्या आजरा तालुक्यातील देवर्डे व पारेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन आबिटकर यांनी केले.
देवर्डे (ता. आजरा) येथे नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी आनंदा जोशिलकर होते. आबिटकर म्हणाले, निवडणुकीनंतरच्या एकोप्यामुळे विकासाला गती मिळते. देवर्डेकरांनी एकोपा दाखवून आदर्श निर्माण केला आहे. सरपंच जी. एम. पाटील म्हणाले, देवर्डे-पारेवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझी सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, अशोक चराटी, ओंकार पाटील, जोशिलकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सरपंच पाटील, उपसरपंच संगीता चाळके, सदस्य सर्जेराव पाटील, शैला चाळके आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीपतराव देसाई, ज्योत्स्ना चराटी, जोतिबा चाळके, केशव पाटील, दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, सुधीर कुंभार, मसाजी पाटील, बाळ केसरकर आदी उपस्थित होते
बळीराम तानवडे यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचलन केले तर श्रावण जाधव यांनी आभार मानले.
* फोटो ओळी : देवर्डे (ता. आजरा) येथे नूतन सरपंच जी. एम. पाटील यांचा माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी सत्कार केला. यावेळी अर्जुन आबिटकर, अशोक चराटी, श्रीपतराव देसाई, सुधीर कुंभार, केशव पाटील, मसाजी पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : १६०२२०२१-गड-०६