शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील -सतेज पाटील यांचे आश्वासन : मनपा शिक्षक पतसंस्थेच्या इमारतीचे थाटात उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:22+5:302021-09-05T04:29:22+5:30

कोल्हापूर : शासनाकडून महानगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी ...

Efforts to get 100% salary for teachers - Assurance of Satej Patil: Inauguration of Municipal Teachers Credit Union building | शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील -सतेज पाटील यांचे आश्वासन : मनपा शिक्षक पतसंस्थेच्या इमारतीचे थाटात उदघाटन

शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील -सतेज पाटील यांचे आश्वासन : मनपा शिक्षक पतसंस्थेच्या इमारतीचे थाटात उदघाटन

Next

कोल्हापूर : शासनाकडून महानगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.

कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे अध्यक्षस्थानी होते. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगेशकरनगरात कार्यक्रम झाला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, एखाद्या शिक्षकाला आर्थिक अडचण आली तर ही पतसंस्था त्यांना तत्काळ मदत करते ही कौतुकास्पद बाब आहे. अशा संस्था टिकणे महत्त्वाचे आहे. महापालिकास्तरावर सुटणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांशी चर्चा करावी.

आमदार आसगावकर, आमदार जाधव यांनी भविष्यात या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. कार्यक्रमास बाबासाहेब यादव, विनायक शिंगे, भरत रसाळे, बाबा यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सभापती संजय पाटील यांनी स्वागत केले. संस्थेचे मानद चिटणीस सुधाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. संजय कडगावे यांनी आभार मानले.

चौकट

नवीन इमारत

महापालिकेंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक अडचणी चार दशकापूर्वी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची सुरवात झाली. पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हतामुळे संस्थेची उलाढाल वाढली. संस्थेने कोल्हापुरातील मंगेशनगर इथे नवीन इमारत उभारली आहे, असे सुधाकर सावंत यांनी प्रास्ताविकात सांगितले.

फोटो : ०४०९२०२१-कोल- उदघाटन

कोल्हापुरातील मंगेशकरनगरात शनिवारी कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, प्रभारक आरडे आदी उपस्थित होते.

Web Title: Efforts to get 100% salary for teachers - Assurance of Satej Patil: Inauguration of Municipal Teachers Credit Union building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.