संत रोहिदास चर्मकार महामंडळ बैठकीसाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:10+5:302020-12-07T04:18:10+5:30
कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील सर्व योजनांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित ...
कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील सर्व योजनांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्या, मंगळवारी संबंधित सचिव, अधिकारी व संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत त्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांना पत्र लिहिले आहे.
रघुनाथ मोरे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या वतीने पालकमंत्री पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार पाटील यांनी हे नियोजन केले आहे.
महामंडळाकडील सर्व योजना पूर्ववत चालू करणे, आहे ती कर्ज योजना पाच ते २५ लाख करणे, बीज भांडवल कर्ज योजना महामंडळाचा भाग ४५ टक्के करून त्यात ३० हजार अनुदान देणे, कर्जास नोकरवर्ग जामीन घेतात ते रद्द करण्याबाबत, सरसकट कर्जमाफी होण्याबाबत, व्याज परतावा कर्ज योजना चालू करण्याबाबत हे विषय बैठकीत घ्यावेत, असे पालकमंत्री पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.