कोल्हापूरला आयटी पार्कसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:09+5:302021-02-14T04:22:09+5:30

कागल : यापूर्वीचे फडणवीस सरकार उत्सवप्रियच जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांची गुंतवणूक लाखो कोटींच्या आकड्यात फक्त जाहीर ...

Efforts for IT Park at Kolhapur | कोल्हापूरला आयटी पार्कसाठी प्रयत्न

कोल्हापूरला आयटी पार्कसाठी प्रयत्न

Next

कागल : यापूर्वीचे फडणवीस सरकार उत्सवप्रियच जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांची गुंतवणूक लाखो कोटींच्या आकड्यात फक्त जाहीर केली. त्याचे पुढे काहीच झाले नाही. आमचे ठाकरे सरकार जमिनीवर पाय ठेवून काम करीत आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योगधंद्यांच्या बाबतीत झाली आहे. कोल्हापुरातदेखील मोठी गुंतवणूक होत असून, नजीकच्या काळात सर्व तपशील जाहीर करू. कोल्हापूरला आयटी पार्क बनविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

केनवडे, ता. कागल येथील अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्सच्या चाचणी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, अरुण भाई दुधवडकर, विजय देवणे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार पी.एन. पाटील होते.

देसाई म्हणाले, सध्या जगभरात साखरेऐवजी गुळाला मागणी आहे. संजय घाटगे यांनी दूरदृष्टी दाखवून हा प्रकल्प सुरू केला आहे. शासन या प्रकल्पाच्या पाठीशी उभे आहे. स्वागत जि.प. सदस्य अंबरीश घाटगे यांनी केले.

प्रास्ताविकात संजय घाटगे म्हणाले, केनवडे व्हनाळी हा परिसर अत्यंत गरीब अवस्थेत होता. अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून परिसर हिरवागार झाला. आता या साखर कारखान्याच्या उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी येईल.

हसन मुश्रीफ म्हणाले, हा चाचणी हंगाम घेतल्यानंतर पुढील वर्षी पूर्ण क्षमतेने साखर कारखाना चालेल. लवकरच कर्जमुक्त होऊन मोठ्या साखर कारखान्यात याचे रूपांतर होईल. मी दिलदार मित्राच्या पाठीशी हिमालयसारखा उभा आहे. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार पी.एन. पाटील यांची भाषणे झाली. आभार माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी मानले.

उद्धव ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री

सुभाष देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे हे देशात नंबर एकचे मुख्यमंत्री असल्याचे एका सर्वेक्षणात जाहीर झाले आहे. संजय घाटगे यांचा अनेकदा पराभव झाला; पण ते निराश न होता सामान्य लोकांसाठी कार्यरत आहेत. हसन मुश्रीफ हे गोरगरिबांसाठी मसिहा आहेत. मुंबईत मला लोक सांगतात की, कागल तालुक्यातल्या लोकांना आजाराची काळजी वाटत नाही. कारण हसन मुश्रीफ सर्व उपचार मोफत करून देतात.

१३ केवनडे

फोटो ओळी

केनवडे येथे अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Efforts for IT Park at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.