‘ईडब्ल्यूएस’प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:35+5:302021-09-03T04:25:35+5:30

उठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. त्यावर शिष्टमंडळाचे ...

Efforts should be made to raise the 50 per cent limit as per EWS | ‘ईडब्ल्यूएस’प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

‘ईडब्ल्यूएस’प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

Next

उठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. त्यावर शिष्टमंडळाचे म्हणणे राष्ट्रपतींनी सविस्तरपणे आणि गांभीर्यपूर्वक ऐकून घेतले. पुढील कार्यवाही करण्यासाठी या विषयावर अभ्यास करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतींच्या या भेटीकरिता खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत खासदार विनायक राऊत (शिवसेना), खासदार वंदना चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप),आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) हे शिष्टमंडळात सहभागी झाले. १०५ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करणे. त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार करून त्यानंतर मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. इंद्रा साहनी खटल्यात सांगितल्याप्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदूरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकारमार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. तसे शक्य होणार नसेल, तर ईडब्ल्यूएसप्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आम्ही केली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

चौकट

मराठा समाजातील वास्तविकता मांडली

गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. ही समाजाची वास्तविकता राष्ट्रपतींपुढे मांडून या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती

त्यांना केली असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

फोटो (०२०९२०२१-कोल-राष्ट्रपती भेट) : दिल्ली येथे गुरुवारी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. यावेळी खासदार विनायक राऊत, वंदना चव्हाण, रणजितसिंह नाईक-निंबाळकर ,आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.

फोटो (०२०९२०२१-कोल-राष्ट्रपती भेट ०१) : दिल्ली येथे गुरुवारी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावेळी खासदार वंदना चव्हाण यांनी राष्ट्रपतींना राजर्षी शाहू महाराज चरित्र ग्रंथ भेट दिला. शेजारी खासदार विनायक राऊत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.

020921\02kol_13_02092021_5.jpg~020921\02kol_14_02092021_5.jpg

फोटो (०२०९२०२१-कोल-राष्ट्रपती भेट) : दिल्ली येथे गुरूवारी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. यावेळी  खासदार विनायक राऊत, वंदना चव्हाण, रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.फोटो (०२०९२०२१-कोल-राष्ट्रपती भेट ०१) : दिल्ली येथे गुरूवारी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावेळी खासदार वंदना चव्हाण यांनी राष्ट्रपतींना राजर्षी शाहू महाराज चरित्र ग्रंथ भेट दिला. शेजारी  खासदार विनायक राऊत, रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.~फोटो (०२०९२०२१-कोल-राष्ट्रपती भेट) : दिल्ली येथे गुरूवारी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. यावेळी  खासदार विनायक राऊत, वंदना चव्हाण, रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.फोटो (०२०९२०२१-कोल-राष्ट्रपती भेट ०१) : दिल्ली येथे गुरूवारी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावेळी खासदार वंदना चव्हाण यांनी राष्ट्रपतींना राजर्षी शाहू महाराज चरित्र ग्रंथ भेट दिला. शेजारी  खासदार विनायक राऊत, रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.

Web Title: Efforts should be made to raise the 50 per cent limit as per EWS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.