पदाधिकारी बदलात तिघांचे प्रयत्न ठरले महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:46+5:302021-07-14T04:29:46+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलामध्ये शिंगणापूरचे अमर पाटील, शशिकांत खोत आणि अर्जुन आबिटकर यांची ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलामध्ये शिंगणापूरचे अमर पाटील, शशिकांत खोत आणि अर्जुन आबिटकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. यातील अमर पाटील यांच्या पत्नी रसिका यांना सभापतिपद मिळाले, तर आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांचे पद निश्चित होते. मात्र, खोत यांना यावेळी संधी मिळाली नाही.
पदाधिकाऱ्यांचे लवकर राजीनामे होत नसतानाच्या परिस्थितीत नेते मंडळीच्या सूचनांनुसार बैठका आयोजित करण्यापासून ते कागदोपत्री आवश्यक बाबी करण्यासाठी या तिघांनी पुढाकार घेतला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शिवसेनेकडून आवश्यक पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी आबिटकर यांच्यावर सोपवण्यात आली. सतेज पाटील यांनी शशिकांत खोत आणि अमर पाटील यांच्यावर दोन्ही कॉंग्रेसच्या सदस्यांची जबाबदारी देण्यात आली.
या तिघांनीही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांसाठी राजी करणे, ते घेणे, पुढील कार्यवाही करून घेणे यासाठी धावपळ केली. याच दरम्यान राजीनामे देण्याआधी पदाधिकाऱ्यांच्या विकास निधीविषयकचे प्रश्न आबिटकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत संपवून टाकले. खोत, पाटील यांनी आक्रमकपणे तर आबिटकर यांनी शांतपणे या सर्व गोष्टी हाताळल्या. त्यांना आवश्यक त्याठिकाणी सतीश पाटील, उमेश आपटे यांचे सहकार्य मिळाले आणि पदाधिकारी बदलाची मोहीम यशस्वी झाली.