आजऱ्यात ईदची रक्कम पूरग्रस्तासाठी, गडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:20 PM2019-08-12T17:20:22+5:302019-08-12T17:21:05+5:30
आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली.
आजरा : आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली.
दरवर्षी इदगाह मैदानामध्ये बकरी ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधव एकत्र येवून ईदगाह मैदानावर नमाज पठण करतात. मात्र, महापुरामुळे यावेळी प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. नाईक गल्लीतील मरकज मशिदीमध्ये खुतबा पठण फिरोज चाँद यांनी तर नमाज पठण रहेमान कांडगांवकर यांनी केले. यावेळी पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी लाखो रूपयांची मदत पूरग्रस्तासाठी जमा करण्यात आली.
गडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटप
गडहिंग्लज येथील सुन्नी जुम्मा मस्जिदतर्फे शहरातील मुस्लिम बांधवांनी अत्यंत साधेपणाने बकरी ईद साजरी केली. मरकज मस्जीद व गांधीनगरमधील पॅव्हेलियन येथे सामुदायिक नमाज व खुतबा पठण मौलाना मेहमूद रजा, मौलाना फईम मुल्ला व नदीम बाबा शेख यांनी केले.
यावेळी पूरग्रस्तांवरील अस्मानी संकट दूर व्हावे व पूर्ववत परिस्थिती सुरळीत होवून समृद्धी यावी यासाठी विशेष सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर गळाभेट घेवून समाज बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अध्यक्ष राजूभाई खलिफ, सचिव आशपाक मकानदार, एम. एस. बोजगर, इर्षाद मकानदार आदींसह दादा जे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. युनूस नाईकवाडे यांनी आभार मानले.
दरम्यान, महापुरामुळे बाधित झालेल्या नदीवेस परिसरातील पूरग्रस्तांचे शहरातील म. दुं. श्रेष्ठी विद्यालय, काळू मास्तर विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी आश्रयाला असणाºया पूरग्रस्तांना मुस्लिम बांधवांनी शिरकुर्मा देवून ईद साजरी केली.
यावेळी इम्रान मुल्ला, शकील जमादार, अमजद मीरा, वासिम वाटंगी, आफताब नदाफ, आयुब सय्यद, समीर खडकवाले, इरफान मुजावर, समीर राऊत, जीया उटी, शाहरुख जिनाबडे, आशपाक किल्लेदार, मुश्ताक मकानदार, इकबाल नणंदीकर, रियाज काझी, जाफर तपकिरे, इरशाद चिंचलीकर, हसन पेंटर यांच्यासह लकी गु्रपचे कार्यकर्ते उपस्थित होते.