आज मध्यरात्रीपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:42+5:302021-05-15T04:23:42+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून जिल्ह्यात आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात ...
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून जिल्ह्यात आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. रविवारी (दि. २३) रात्री बारा वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असून, या काळात शहरातील सर्व व्यवहार बंद राहतील व नागरिकांना वैद्यकीय वगळता अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यास बंदी असणार आहे. याबाबत जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असून, रोज दीड हजाराच्यावर पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत, तर मृतांचा आकडाही ५० च्यावर आहे. सध्या आयसीयू, ऑक्सिजन बेडची कमतरता, ऑक्सिजनसह रेमडेसिविर औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांच्या कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत केवळ दोन टप्प्यांत दूध, भाजीपाला व गॅसची घरपोच सेवा देण्यात येणार आहे, तर पेट्रोल-डिझेल फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी दिले जाईल. वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नाही.
--