विभागात अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:44 AM2018-08-09T00:44:38+5:302018-08-09T00:48:13+5:30

कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर/सांगली) ३७ कारखान्यांनी हंगाम २०१७/१८ मध्ये उत्पादित केलेल्या साखरेपैकी तब्बल ५७ लाख ६२ हजार मे. टन साखर शिल्लक असून, आगामी साखर हंगाम तोंडावर असताना

Eight lac metric tons of sugar left in the division | विभागात अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन साखर शिल्लक

विभागात अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन साखर शिल्लक

googlenewsNext
ठळक मुद्देहंगाम तोंडावर : पुढील वर्षी गोडावून रिकामी करण्याचे अग्निदिव्य

कोपार्डे : कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर/सांगली) ३७ कारखान्यांनी हंगाम २०१७/१८ मध्ये उत्पादित केलेल्या साखरेपैकी तब्बल ५७ लाख ६२ हजार मे. टन साखर शिल्लक असून, आगामी साखर हंगाम तोंडावर असताना गोडावून कशी रिकामी करायची, असा प्रश्न आता कारखानदारांसमोर उभा राहिला आहे.

हंगाम २०१७/१८ मध्ये उसाचे प्रचंड उत्पादन झाल्याने साखर उत्पादनानेही उच्चांकी आकडा गाठला होता. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी ४५ लाख २३ हजार ३७० मे. टन साखर उत्पादन झाले. तर सांगली जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी २५ लाख ४७ हजार ५९३ मे. टन साखर उत्पादन केले होते. तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांंकडे मागील हंगामातील (हंगाम २०१६/१७) १८ लाख ६१ हजार ७२६ मे. टन साखर शिल्लक होती.

२०१७/१८ चा हंगाम सुरू होताना साखरेचे दर ३४०० रुपये क्विंटल होता; पण हंगाम नोव्हेंबर २०१७ मध्ये साखरेच्या दरात घसरण सुरू झाली. हंगाम संपता संपता फेब्रुवारी २०१८ मध्ये साखरेचे दर २४०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यामुळे कारखानदारांनी साखर विक्रीला काढण्यासाठी हात आखडता घेतला. परिणामी, जानेवारी ते एप्रिल २०१८ मध्ये साखर विक्री ठप्प झाली होती. यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आले. यावर केंद्र शासनाने साखर उद्योगाला दिलासा देणारे चार महत्त्वाचे निर्णय घेतले. यात ३० लाख टन बफर स्टॉक, साखर निर्यातीसाठी अनुदान व कारखानदारांना २९०० रुपयांपेक्षा कमी दरात विक्री करता येणार नाही. याचबरोबर साखर विक्रीसाठी दर महिन्याला ठराविक कोटाच शासन जाहीर केला असल्याने सध्या साखरेचे दर ३२०० ते ३३५० रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. आगामी सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात मोठी वाढ होणार, असे संकेत मिळत आहेत. याच वाढणाऱ्या दराचा फायदा घेण्यासाठी कारखानदार इच्छुक आहेत. येत्या हंगामातही साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर या काळात साखरेचा खप चांगला झाला, तरच कारखानदारांना हंगाम २०१८/१९ मध्ये उत्पादित होणाºया साखरेला गोडावून उपलब्ध होणार आहे. अन्यथा, कारखानदार साखर साठवणुकीबरोबर आर्थिक आरिष्टात सापडणार आहेत.

कारखान्यांकडे असलेला साखर साठा
कोल्हापूर जिल्हा
वारणा - ९६५८०, भोगावती - ६५५३१, राजाराम बाबडा - ४८७११, शाहू कागल - ४५८१८, दत्त शिरोळ - ९८८१९, बिद्री - ४८६६८, गडहिंग्लज हरळी - २४०८९, जवाहर - १७०९९९, मंडलिक - ४२४३१, कुंभी-कासारी - ७७८६७, पंचगंगा इंचलकरंजी - ५७४१, शरद नरदे - ६०३०५, आजरा - २३६५७, उदय गायकवाड - १९६९९, डी. वाय. पाटील - २७६०४, गुरुदत्त टाकळी - ७०१९२, नलवडे शुगर - १८२२, हेमरस - ३३७५२, महाडिक शुगर - १०३१४, संताजी घोरपडे - ४०६६८, दत्त दालमिया - २५६६३, इंदिरा तांबाळे - २१२५६.

सांगली जिल्हा
मानगंगा आटपाडी - ११२०९, किसन आहिर वाळवा- ६९३९६, रा. बा. पाटील साखराळे -१०४०९५.१, रा. बा. पाटील वाटेगाव - ३९३३७.४, रा. बा. पाटील कारंदवाडी -३६५१३.२, मोहन शिंदे - ३३५८८, विश्वास नाईक चिखली -४६८५२, क्रांती कुंडल - ७४१२२, सदगुरु राजेवाडी - ७२५१०, सोनहिरा वांगी - ८१३४९, महाकाली कवठेमहांकाळ - १०७६४, वसंतदादा सांगली - १३००५, उदगीर खानापूर - ४६७४८, केन अँग्रो - १७६३७, निनाईदेवी शिराळा - १०४२९.


सांगली जिल्हा मानगंगा आटपाडी - ११२०९, किसन आहिर वाळवा- ६९३९६, रा. बा. पाटील साखराळे -१०४०९५.१, रा. बा. पाटील वाटेगाव - ३९३३७.४, रा. बा. पाटील कारंदवाडी -३६५१३.२, मोहन शिंदे - ३३५८८, विश्वास नाईक चिखली -४६८५

Web Title: Eight lac metric tons of sugar left in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.