हलगीच्या ठेक्यावर दंडवत घालत पठ्ठ्या अंबाबाई मंदिरात पोहोचला फक्त मुख्यमंत्र्यांसाठी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 19:41 IST2024-11-26T19:40:53+5:302024-11-26T19:41:58+5:30
दुर्वा दळवी कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी कोल्हापुरातील एका सरपंचाने करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे ...

हलगीच्या ठेक्यावर दंडवत घालत पठ्ठ्या अंबाबाई मंदिरात पोहोचला फक्त मुख्यमंत्र्यांसाठी..
दुर्वा दळवी
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी कोल्हापुरातील एका सरपंचाने करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घातले. येवती गावचे सरपंच सागर जाधव यांनी आज, मंगळवारी आपल्या काही कार्यकर्त्यांच्या सोबत हलगीच्या ठेक्यावर देवीला दंडवत घातला.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवे विधानमंडळ स्थापन होण्यासाठी आजच मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तम कामगिरी करत जनमानसात छाप पाडली आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवा चरणी प्रार्थना केली जात आहे.
करवीर तालुक्यातील येवती गावचे सरपंच सागर जाधव यांनी अंबाबाई देवीच्या चरणी दंडवत घालत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी साकडे घातले आहे. हलगीच्या ठेक्यावर त्यांनी देवीला दंडवत घातला. त्यांच्या या साकड्याला यश मिळते का हे मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर झाल्यावरच कळेल.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ७२ सभा घेतल्या. या सभांमुळेच महायुतीला पुन्हा एकदा यश मिळाले असून शिंदे यांच्या कामगिरीवर राज्यातील जनता खुश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच महायुतीने संधी द्यावी. - सागर जाधव, येवती, करवीर