पेन्शनच्या आमिषाने कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याला भामट्याचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:39+5:302020-12-30T04:32:39+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोदाबाई आणि त्यांचे पती अण्णाप्पा कांबळे हे वृद्ध दाम्पत्य सोमवारी निपाणी येथे उपचारासाठी गेले ...

An elderly couple from Karnataka were lured by a pensioner | पेन्शनच्या आमिषाने कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याला भामट्याचा गंडा

पेन्शनच्या आमिषाने कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याला भामट्याचा गंडा

Next

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोदाबाई आणि त्यांचे पती अण्णाप्पा कांबळे हे वृद्ध दाम्पत्य सोमवारी निपाणी येथे उपचारासाठी गेले होते. दुपारी गावी जाण्यासाठी ते निपाणी बसस्थानकावर आले होते. त्यावेळी एका भामट्याने त्यांना गाठले. त्यांना शासकीय योजनेतून एक लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोल्हापुरात आणून रुईकर कॉलनी परिसरात उद्यानात थांबविले. कार्यालयातील साहेब तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून तुम्हाला पेन्शन देणार नाहीत, असे सांगून भामट्याने त्यांचे सोन्याचे गंठण आणि कर्णफुले काढण्यास सांगितले. त्यानंतर त्याने ते दागिने घेऊन साहेबांना भेटून येतो, असे सांगून पोबारा केला. बराच वेळ भामट्याची वाट पाहून तो परत न आल्याने कांबळे दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गोदाबाई कांबळे यांनी अज्ञात भामट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

फोटो नं. २८१२२०२०-कोल-गोदाबाई कांबळे

ओळ : फसवणूक झालेल्या गोदाबाई कांबळे

Web Title: An elderly couple from Karnataka were lured by a pensioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.