kolhapur News: गव्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध शेतकरी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 12:20 PM2023-05-11T12:20:03+5:302023-05-11T12:34:12+5:30

सदाशिव मोरे आजरा : कासारशेत (ता. आजरा)  येथे गव्याच्या हल्ल्यात गुंडू भैरू केसरकर ( वय ८० रा. चाफे गल्ली ...

Elderly farmer serious in gaur attack | kolhapur News: गव्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध शेतकरी गंभीर जखमी

kolhapur News: गव्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध शेतकरी गंभीर जखमी

googlenewsNext

सदाशिव मोरे

आजरा : कासारशेत (ता. आजरा)  येथे गव्याच्या हल्ल्यात गुंडू भैरू केसरकर ( वय ८० रा. चाफे गल्ली आजरा ) हे वयोवृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. ऊसाला पाणी पाजणे व काजू गोळा करण्यासाठी गेले असता आज, गुरुवारी सकाळी ८.३० वा. ही घटना घडली. 

केसरकर हे शेतात काम करत असताना गव्याने अचानक हल्ला केला. याहल्ल्यात पोटात व हातात सिंग घुसले आहे. तातडीने त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे. वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल संजय निळकंठ यांनी तातडीने भेट देऊन जखमीच विचारपूस केली.

Web Title: Elderly farmer serious in gaur attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.