अपघातात वृद्ध जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:37+5:302021-02-06T04:41:37+5:30

कोल्हापूर : कागल येथील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना झालेल्या अपघातात वृद्ध जखमी झाला आहे. हिंदुराव पाटील (वय ६६, रा. ...

Elderly injured in accident | अपघातात वृद्ध जखमी

अपघातात वृद्ध जखमी

Next

कोल्हापूर : कागल येथील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना झालेल्या अपघातात वृद्ध जखमी झाला आहे. हिंदुराव पाटील (वय ६६, रा. केनवडे, कागल) असे जखमीचे नाव असून, जखमी अवस्थेत पाटील यांना सीपीआर रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत केली आहे.

एकाला मारहाण

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून राहत्या घराजवळ एकाला मारहाण करण्यात आली. रामकृष्ण संतोष पवार (वय २५, रा. दिगवडे, ता. पन्हाळा) असे जखमीचे नाव असून, त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत केली आहे.

बुडताना महिलेला वाचवले

कोल्हापूर : पंचगंगा नदीमध्ये बुडताना एका महिलेला पोलीस व नागरिकांनी वाचवले. ही घटना गुरुवारी दुपारी शिवाजी पुलानजीक घडली. या महिलेला वाचवतानाची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल झाली होती. याबाबतची नोंद पोलिसात झालेली नाही.

Web Title: Elderly injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.