Kolhapur: कुडित्रेत वृध्दाचा मद्यपी तरुणाकडून खून, हल्लेखोराच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाईकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 01:07 PM2024-02-11T13:07:20+5:302024-02-11T13:07:48+5:30

Kolhapur News: कुडित्रे (ता. करवीर) येथे भरचौकात गावातीलच मद्यपी तरुणाने लाकडी दांडक्याने वृद्धाच्या डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला. जम्बा भगवंत साठे (वय६५, रा. कुडित्रे) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. ११) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

Elderly man killed by drunken youth in Kuditret, relatives of deceased wanted to arrest assailant | Kolhapur: कुडित्रेत वृध्दाचा मद्यपी तरुणाकडून खून, हल्लेखोराच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाईकांचा ठिय्या

Kolhapur: कुडित्रेत वृध्दाचा मद्यपी तरुणाकडून खून, हल्लेखोराच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाईकांचा ठिय्या

- प्रकाश पाटील
कोपार्डे - कुडित्रे (ता. करवीर) येथे भरचौकात गावातीलच मद्यपी तरुणाने लाकडी दांडक्याने वृद्धाच्या डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला. जम्बा भगवंत साठे (वय६५, रा. कुडित्रे) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. ११) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मारहाणीनंतर संशयित हल्लेखोर रतन बाळासो भास्कर (रा. कुडित्रे) हा पळून गेला. खुनाची घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्बा साठे हे गावातील चौकात गावकऱ्यांसोबत बोलत थांबले होते. गावातील रतन भास्कर हा मद्यपी माथेफिरू तरूण हातात लाकडी दंडुका तिथे पोहोचला. त्याने बोलत उभे असलेल्या चौघातील जंम्बा साठे यांच्या डोक्यावर हातातील दंडुक्याने हल्ला केला. वर्मी घाव लागताच साठे खाली पडले. त्यानंतर सलग आठ ते दहा वेळा डोक्यात दंडुका घालून त्यांच्या डोक्याचा चेंदा-मेंदा केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जम्बा साठे यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यादरम्यान जवळ असणाऱ्या लोकांनी घाबरून पळ काढला. खुनानंतर हल्लेखोर भास्कर मठ गल्लीच्या दिशेने पळून गेला. पुढे एका शेतक-याची दुचाकी गेऊन तो निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

संशयित रतन भास्कर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर दहा वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला गांजा आणि दारुचे व्यसन असल्याचे स्थानिकांनी सांगितले. माहिती मिळताच करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हल्लेखोराला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मध्यस्थी करून मृताच्या नातेवाईकांची समजूत काढली. या वादात सुमारे तीन तास मृतदेह जागेवरच पडून होता. 

Web Title: Elderly man killed by drunken youth in Kuditret, relatives of deceased wanted to arrest assailant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.