... त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही प्रेमाचा बंध, थोरल्या जाऊ गेल्या... मी तरी कशाला जगू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:44 PM2020-09-03T17:44:36+5:302020-09-03T17:46:52+5:30
वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जावांमधील सख्ख्या बहिणीच्या नात्यासारख्या हा प्रेमाचा बंध त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही.
कोल्हापूर : वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जावांमधील सख्ख्या बहिणीच्या नात्यासारख्या हा प्रेमाचा बंध त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही.
धाकटी जाऊ आक्काताई यांचे निधन झाल्यानंतर थोरल्या जाऊ रत्नाबाई यांनी आमची ५० वर्षांची जोडी देवाने फोडली. आता मीही जगत नाही, असे म्हणत पुणे येथे नोकरीनिमित्त राहत असलेल्या मुलाला फोन केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचेही हृदयविकाराने निधन झाले. एका कुटुंबात सख्ख्या जावा-जावांचे पटत नाही, अशी अनेक कुटुंबातील उदाहरणे आहेत. मात्र, सख्ख्या जावेपेक्षा एक मैत्रीण म्हणून या दोघी एकमेकींवर संसाराला सुरुवात झाल्यापासून जिवापाड प्रेम करीत होत्या.
आक्काताईंचे पती आप्पासाहेब हे जळगाव येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत नोकरीस होते. ते सध्या शेती करतात. रत्नाबाई यांचे पती बापू कोळी यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या दोघींच्या पश्चात मोठा परिवार आहे. एक दिवसाच्या अंतराने सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याने कोळी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.