निवडणुकीची माहिती आता ‘वेब पेज’वर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:10 AM2018-09-17T01:10:50+5:302018-09-17T01:10:53+5:30

Election information now available on 'web page' | निवडणुकीची माहिती आता ‘वेब पेज’वर उपलब्ध

निवडणुकीची माहिती आता ‘वेब पेज’वर उपलब्ध

Next

प्रविण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा, विधानसभेसह इतर निवडणुकांची माहिती चटकन उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेब पेज तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व माहिती भरण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीच याचा वापर होणार असून, लवकरच त्याला सुरुवात होणार आहे.
मतदार संघ, मतदान केंद्रे, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणूकविषयक पुस्तके, राजकीय पक्ष, निवडणूकविषयक कायदे, मतदान यंत्रे, मतदान जनजागृती अभियान, आदींची माहिती एकत्रितरीत्या अधिकाºयांसह कर्मचाºयांना सहजरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने हे निवडणुकीचे वेब पेज तयार केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून हे पेज तयार केले आहे. त्याला ‘एनआयसी’च्या माध्यमातून तांत्रिक हातभार लावण्यात आला आहे.
आॅनलाईनद्वारे भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्च केल्यानंतर हे पेज पाहायला मिळणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ते उघडले जाऊन त्यामध्ये निवडणूकविषयक माहिती समोर येणार आहे. देशापासून गावापर्यंतच्या निवडणूक यंत्रणेची इत्थंभूत माहिती या माध्यमातून मिळणार आहे. अशा सुविधेची सुरुवात बहुधा कोल्हापुरातूनच पहिल्यांदा होत आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांसाठी याचा वापर केला जाणार आहे. किंबहुना कर्मचाºयांना निवडणूकविषयक माहिती चटकन मिळावी, यामध्ये जास्त वेळ जाऊ नये, हे डोळ्यांसमोर ठेवूनच जिल्हा प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. येणाºया काळात याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. कर्मचारी-अधिकाºयांबरोबरच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांनाही याचा उपयोग होऊ शकतो; परंतु प्रशासनाकडून सध्या तरी याचा विस्तार करण्याचा कोणताही विचार दिसत नाही.
वेब पेजवर ही असेल माहिती
उमेदवार, राजकीय पक्ष, उमेदवारीसह अन्य अर्ज, मतदान यंत्रे, प्रशिक्षण साहित्य, मतदान जनजागृतीसंदर्भातील प्रयोग, ओव्हरसीज व्होटर्स पोर्टल, सर्व्हिस व्होटर पोर्टल, नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल, नॅशनल ग्रीव्हॅन्सेस सर्व्हिस पोर्टल, आय.टी. अ‍ॅँड आॅटोमेशन डिव्हिजन, आदी स्वरूपांतील माहिती या वेब पेजवर असेल.
निवडणूकविषयक पुस्तकांचीही माहिती वेबपेजवर
निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती या वेब पेजवर असणार आहे. यामध्ये मॅन्युअल आॅन इलेक्शन रेग्युलेटरी आॅडिट-२०१६, हॅँडबुक फॉर एआरओ अ‍ॅँड एईआरओ सर्टिफिकेशन-
पार्ट- १ व २, मॅॅन्युअल आॅन स्विप, मॅन्युअल आॅन डिस्ट्रिक्ट इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅनिंग, मॅन्युअल आॅन पोलिंग स्टेशन अशा २० हून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.

Web Title: Election information now available on 'web page'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.