जिल्ह्यातील २० विकास संस्थांच्या निवडणुका जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:44+5:302021-01-16T04:28:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील २० विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी (दि. १८) प्रारूप यादी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील २० विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी (दि. १८) प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये चंदगड व कागल तालुक्यांतील प्रत्येकी पाच संस्थांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २२२ विकास संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
कर्जमाफी व नंतर कोरोनामुळे लांबणीवर टाकलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा बँक व ‘गोकुळ’ या शिखर संस्थांची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५९४ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहेत. यामध्ये २२२ विकास संस्थांचा समावेश असून, कागल व चंदगड तालुक्यांतील प्रत्येक पाच संस्थांचा समावेश आहे. सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून, बुधवार (दि. २०)पर्यंत हरकती घेता येणार आहेत. १ फेब्रुवारीपर्यंत हरकतीवर सुनावणी घेऊन निर्णय द्यायचा असून, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
या संस्थांच्या लागल्या निवडणुका -
शिरोळ : रत्नदीप-गौरवाड, बापूसाो पाटील-बस्तवाड.
गगनबावडा : ज्ञानेश्वर माऊली-धुंदवडे, उदय-खोपडेवाडी, शिवाजी-किरवे.
कागल : हसूर खुर्द, चिमगाव, बलभीम-भडगाव, काळम्मा-बेलेवाडी, हनुमान-जैन्याळ.
करवीर : पांडुरंग-सांगरूळ, हनुमान-कोगील बुद्रूक, यमाई-म्हाळुंगे.
चंदगड : यशवंत-शिनोळी खुर्द, आदर्श-कडलगे खुर्द, तुळजाई-मुरकुटेवाडी, ब्रम्हलिंग-सुस्ते, गुळंबादेवी-कळसगादे.
गडहिंग्लज : निलजी, रामलिंग-कडलगे.
अशा होणार पहिल्या टप्प्यातील निवडणुका-
एकूण संस्था - ५९४
विकास -२२२
पतसंस्था - ‘क’ : १७६, ‘ड’ : १८६
‘अ’ वर्ग - १०