निवडणुकीची लगीनघाई सुरू, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:13+5:302021-02-06T04:45:13+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय स्तरावर लगीनघाई सुरू झाली. अत्यंत किचकट असे प्रभागनिहाय तसेच मतदार केंद्रनिहाय ...

Elections begin in a hurry, appointments of officers | निवडणुकीची लगीनघाई सुरू, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

निवडणुकीची लगीनघाई सुरू, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय स्तरावर लगीनघाई सुरू झाली. अत्यंत किचकट असे प्रभागनिहाय तसेच मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या प्रारूप स्वरुपात करण्याची कार्यवाही प्रत्यक्षात शुक्रवारपासून सुरू झाली असून, विभागीय कार्यालयस्तरावर नियंत्रण अधिकारी तसेच उपशहर अभियंता यांच्या नियुक्त्या करून त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली.

सर्व प्रभागांच्या प्रारूप मतदार यादी व अंतिम प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तयार करण्यासह त्या वितरित करण्याकरिता सनियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त रविकांत अडसूळ यांची, तर नोडल अधिकारी म्हणून नेत्रदीप सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादी तयार झाल्यानंतर त्यासंबंधीच्या तक्रारी, हरकती, सूचना यावर मुदतीत कार्यवाही करून मुदतीत अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्याकरिता विभागीय कार्यालयस्तरावर त्या त्या कार्यालयाचे उपशहर अभियंता यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागीय कार्यालयावर २० ते २१ प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना दि. १५ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करून दि. १६ फेब्रुवारीला प्रारूप याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

- अधिकाऱ्यांच्या नियुक्ती-

विभागीय कार्यालय - सनियंत्रण अधिकारी पदनिर्देशित अधिकारी

गांधी मैदान - निखिल मोरे, उपायुक्त -१ एन. एस. पाटील

शिवाजी मार्केट - शिल्पा दरेकर उपायुक्त - ३ रावसाहेब चव्हाण

जगदाळे हॉल - विनायक औंधकर- सहा. आयुक्त बाबूराव दबडे

ताराराणी मार्केट - रविकांत अडसूळ उपायुक्त -२ हर्षजित घाटगे

प्रत्येक विभागीय कार्यालयात प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू राहणार आहे. आज, शनिवारपासून नऊ दिवस हे काम चालणार आहे. निवडणुकीचे काम असल्यामुळे सुटीदिवशीही काम करावे लागणार आहे. निर्धारित वेळेत हे काम करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासकांनी दिल्या आहेत.

Web Title: Elections begin in a hurry, appointments of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.