जिल्ह्यातील संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 09:58 AM2020-04-29T09:58:51+5:302020-04-29T10:01:01+5:30
राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २५०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून, ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, शिक्षक बॅँकेसह ‘राजाराम’, ‘वारणा’ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘कोरोना’चे संकट, पावसाळा या सगळ्यांचा विचार करता या संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार हे निश्चित आहे.
सहकारी संस्थांबाबत ९७वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर एकदमच निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्याने सहकार विभागावर ताण आला. त्यातून आता कोठे निवडणुका नियमित सुरू झाल्या. तोपर्यंत राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिने निवडणुका लांबणीवर टाकल्या. त्याची मुदत १८ जूनपर्यंत आहे. राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
‘कुंभी’ची निवडणूक वेळेतच होणार!
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाऊन २७ डिसेंबरला मतदान होईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाने नियोजन केले असल्याने निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर?
जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. ‘कोरोना’चे संकट आणखी किती काळ राहणार, याचा अंदाज नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका विहीत वेळेत होण्याची शक्यता धूसर आहे.

या प्रमुख संस्थांच्या निवडणुका लटकल्या-
संस्था मुदत कधी संपली
‘गोकुळ’ मार्च २०२०
जिल्हा बॅँक मे २०२०
शिक्षक बॅँक एप्रिल २०२०
‘कोजिमाशि’ एप्रिल २०२०
‘शरद’ साखर मार्च २०२०
डी. वाय. पाटील साखर मार्च २०२०
राजाराम साखर एप्रिल २०२०
वारणा साखर मे २०२०
कुंभी साखर डिसेंबर २०२०
कोल्हापूर बाजार समिती आॅगस्ट २०२०