सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा, आजपासून प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:41 PM2024-10-01T12:41:26+5:302024-10-01T12:41:26+5:30

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पुन्हा अडकणार

Elections of cooperative societies are only 15 days away, the process will start from today  | सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा, आजपासून प्रक्रिया सुरू 

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा, आजपासून प्रक्रिया सुरू 

कोल्हापूर : पावसाळ्यामुळे तीन महिने लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आज, मंगळवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकार विभागाला दिले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता निवडणुकांचा धुरळा पंधरा दिवसच उडणार, हे निश्चित आहे.

काेरोनापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक बिघडले आहे. कोरोनानंतर निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली, पण वेगवेगळ्या कारणाने लांबणीवर टाकल्या गेल्या. ऑक्टोबर २०२३ नंतर निवडणूक घेण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले हाेते. या कालावधीत काही संस्थांच्या निवडणुका होऊन गेल्या, पण तोपर्यंत लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता तब्बल दोन महिने राहिली. जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपली आणि प्रक्रिया सुरू केली, तोपर्यंत पावसाळ्याचे कारण पुढे करत ३० सप्टेंबर पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या.

आजपासून स्थगित प्रक्रिया नव्याने सुरू होत आहे, पण साधारणत: १५ ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकांचा धुरळा पंधरा दिवसच उडणार आहे.
संचालक मंडळाची मुदत संपलेल्या संस्था :

‘ब’ वर्ग : १७३
‘क’ वर्ग : २,३८२
‘ड’ वर्ग (दुग्ध) : २७५
‘ड’ वर्ग (इतर) : १,०९५

अडीच-तीन वर्षे मुदतबाह्य संचालक मंडळ

जिल्ह्यातील काही संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने तिथे अडीच-तीन वर्षे मुदत संपलेले संचालक मंडळ सध्या कार्यरत आहे.

‘ड’ वर्गातील संस्थांचा कार्यक्रम सुरू राहणार?

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सतत स्थगिती दिल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे आल्या आहेत. गेल्या आठवड्यात सहकार विभागाच्या बैठकीत आचार संहिता सुरू झाली, तरी कमी सभासद संख्या असलेल्या ‘ड’ वर्गातील संस्थांचा कार्यक्रम सुरू ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार असल्याचे समजते.

Web Title: Elections of cooperative societies are only 15 days away, the process will start from today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.