जयसिंगपुरात विद्युत शववाहिनी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:21+5:302021-04-17T04:24:21+5:30

जयसिंगपूर : शहरातील गट नं. ६८ आरक्षित जागेवर वैकुंठधाममध्ये विद्युत शववाहिनी उभारण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने आरोग्य ...

An electric hearse should be set up at Jaysingpur | जयसिंगपुरात विद्युत शववाहिनी उभारावी

जयसिंगपुरात विद्युत शववाहिनी उभारावी

Next

जयसिंगपूर : शहरातील गट नं. ६८ आरक्षित जागेवर वैकुंठधाममध्ये विद्युत शववाहिनी उभारण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गट नं. ६८ ही जागा शववाहिनीसाठी आरक्षित आहे. या जागेवर गॅस अथवा विद्युत शववाहिनी उभारण्यासाठी दीड कोटी रुपये इतका निधी पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे या शववाहिनीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंगाडे, शहाजी कोळी, अनिल कुलकर्णी, पप्पू दानोळे, संतोष कुलकर्णी उपस्थित होते. निवेदनाची प्रत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनाही देण्यात आली.

फोटो - १६०४२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे विद्युत शववाहिनी उभारावी, अशा मागणीचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले. यावेळी सुरेश शिंगाडे, पप्पू दानोळे, संतोष कुलकर्णी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: An electric hearse should be set up at Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.