धनदांडग्या १९४४ ग्राहकांकडे ५७ कोटींची वीज बिल थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:43 AM2021-02-18T04:43:57+5:302021-02-18T04:43:57+5:30

(नियोजनातील विषय आहे) नसीम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात वीज बिल थकबाकीचा आकडा सव्वातीनशे कोटींवर गेल्याने महावितरण गोत्यात ...

Electricity bill arrears of Rs 57 crore to wealthy 1944 customers | धनदांडग्या १९४४ ग्राहकांकडे ५७ कोटींची वीज बिल थकबाकी

धनदांडग्या १९४४ ग्राहकांकडे ५७ कोटींची वीज बिल थकबाकी

Next

(नियोजनातील विषय आहे)

नसीम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात वीज बिल थकबाकीचा आकडा सव्वातीनशे कोटींवर गेल्याने महावितरण गोत्यात आली आहे, यात

एक लाखावर वीज बिल थकविलेल्या ग्राहकांचा वाटा तब्बल ५७ कोटी ४३ लाखांचा आहे. घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक या गटातील १९४४ ग्राहकांनी ही बिले थकविल्याने वसुली करायची तरी कशी आणि कधी असा प्रश्न ‘महावितरण’ला भेडसावत आहे.

जिल्ह्यात सर्वप्रकारचे मिळून १२ लाखांवर वीज ग्राहक आहेत. त्यात सर्वाधिक साडेआठ लाख ग्राहक हे घरगुती प्रकारातील आहेत. वाणिज्यिकचे ७८ हजार, औद्योगिकचे २० हजार ग्राहक आहेत. या सर्वांकडे आजच्या घडीला ३४७ कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. यापैकी गेल्या १५ दिवसांत ‘महावितरण’ने वसुलीची मोहीम तीव्र केल्यानंतर ३५ कोटींवर रक्कम वसूलही झाली आहे.

चार पाच हजारांची बिले थकल्याने सर्वसामान्य नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. वीज कनेक्शन तोडण्याच्या धास्तीने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झालेले दिसत आहेत, पण तब्बल एक लाखावर वीज बिले असणारे धनदांडग्यांची संख्याही कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. जिल्ह्यातील थकबाकीदारांमध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्तीची बिले थकविणाऱ्या १९४४ ग्राहकांपैकी ३७९ ग्राहक हे घरगुती व वाणिज्यीक गटातील दिसत आहेत. थकबाकीचा डोंंगर वाढविण्यात उद्याेजकांचाही मोठा हातभार दिसत आहे. त्यामुळेच कोल्हापुरात सर्वाधिक उद्योग असलेला इचलकरंजी विभाग थकबाकीत आघाडीवर आहे.

ग्राफ ०१

एक लाखापेक्षा जास्त रक्कम थकवलेले ग्राहक

प्रकार ग्राहकसंख्या रक्कम

घरगुती ११८ १ कोटी ८९ लाख ६६ हजार

वाणिज्यीक २६१ ५ कोटी ९९ लाख ६४ हजार

औद्योगिक १५६५ ४९ कोटी ५४ लाख ३७ हजार

एकूण १९४४ ५७ कोटी ४३ लाख ६८ हजार

ग्राफ ०२

एप्रिलपासून एकही बिले न भरलेले ग्राहक थकबाकी (कोटी रुपयांत)

घरगुती - ३ लाख ३ हजार ३८ (१७२)

व्यावसायिक - २२ हजार १९५ (३४)

औद्योगिक - ६ हजार ७१८ ( ३९ )

सर्वाधिक थकबाकी इचलकरंजी विभागात

जिल्ह्यातील सर्वाधिक थकबाकी इचलकरंजी विभागात आहे. ९१५ ग्राहकांकडे ३० कोटी ११ लाख ११ हजारांची थकबाकी आजच्या घडीला आहे. सर्वांत कमी थकबाकी गडहिंग्लज विभागात आहे.घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक मिळून ७९ असे सर्वांत कमी ग्राहकांकडे १ कोटी ७८ लाख ६६ हजारांची थकबाकी आहे.

‘औद्योगिक’ची थकबाकी जास्त

एक लाखापेक्षा मोठी रकमेची बिले थकवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १५६५ इतकी संख्या औद्योगिक वीजग्राहकांची आहेत. एकूण ५७ कोटी ४३ लाखांपैक़ी ४९ कोटी ५४ लाखांची थकबाकी या औद्योगिक संस्था चालविणाऱ्यांकडे आहे.

विभागनिहाय लाखावरील थकबाकीदार ग्राहक संख्या

विभाग एकूण ग्राहक थकबाकी

गडहिंग्लज ७९ १ कोटी ७८ लाख ६६ हजार

इचलकरंजी ९१५ ३० कोटी ११ लाख ८१ हजार

जयसिंगपूर २३४ ७ कोटी ५९ लाख १४ हजार

कोल्हापूर ग्रामीण १४६ ३ कोटी ५१ लाख ११ हजार

कोल्हापूर ग्रामीण २९० ८ कोटी ४७ लाख ६१ हजार

कोल्हापूर शहर २८० ५ कोटी ९५ लाख ३५ हजार

Web Title: Electricity bill arrears of Rs 57 crore to wealthy 1944 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.