भिक्षा मागून पोट भरणाऱ्या मालनताईंनी भरले वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:34+5:302021-03-21T04:23:34+5:30

दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : राज्यात वीज बिलाच्या प्रश्नावरून गदारोळ उठलेला असताना तळसंदे (ता. हातकणंगले) येथील ...

Electricity bills paid by beggars | भिक्षा मागून पोट भरणाऱ्या मालनताईंनी भरले वीज बिल

भिक्षा मागून पोट भरणाऱ्या मालनताईंनी भरले वीज बिल

googlenewsNext

दिलीप चरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : राज्यात वीज बिलाच्या प्रश्नावरून गदारोळ उठलेला असताना तळसंदे (ता. हातकणंगले) येथील मालन सर्जेराव पोवार या भिक्षा मागून पोट भरणाऱ्या महिलेने आपले वीज बिल भरून महावितरणच्या

‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ योजनेला प्रतिसाद दिला. वीज बिल भरून सहकार्य केल्याबद्दल महावितरणकडून मालनताईंना दोन महिन्यांचे जीवनावश्यक साहित्य देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने गौरविले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी राबविलेला हा उपक्रम वीज बिल वसुलीसाठी प्रेरणा देणारा आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सरासरी व अंदाजे रीडिंग आधारे वीज बिल आकारणी झाली. बिले वाढून आल्याने वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला. वीज बिल न भरण्याबाबत ग्राहकांमध्ये मानसिकता निर्माण झाली. वीज बिले माफ होण्याच्या आशेने अनेकांनी आपली वीज बिले भरली नाहीत. भावनेच्या भरात शासनाने या काळातील ग्राहकांचे वीज बिलमाफीचे आश्वासन दिले. मात्र, शासनाच्या वारंवार वीज बिल माफीच्या आश्वासनांना ग्राहकांनी हरताळ फासल्याने वीज बिलाची थकबाकी भरमसाठ वाढली. त्यामुळे महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली.

अद्याप वीज बिल भरणे, हप्ते मागून घेणे, अशा तऱ्हेने ग्राहक वीज बिल भरत आहेत. संपूर्ण थकबाकी वसूल होताना दिसत नाही. मात्र, घरची स्थिती हलाखीची असल्याने भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेने सगळे वीज बिल भरल्याने महावितरणच्या कोडोली येथील अधिकाऱ्यांनी या प्रतिसादाला वेगळ्या पद्धतीने दाद दिली. यावेळी कोडोली येथील अधीक्षक अभियंता विनोद माने, पारगाव शाखेच्या कनिष्ठ अभियंत्या श्रुती वैद्य, कर्मचारी शशांक निंबाळकर, अरविंद महाडिक, कर्मचारी उपस्थित होते.

मालनताईंसारख्या ग्राहकामुळे अन्य वीज ग्राहकांना प्रेरणा मिळणार असून, आम्ही अशा ग्राहकांचे सदैव ऋणी राहू, असे सांगितले.

- विनोद माने

अधीक्षक अभियंता, महावितरण कोडोली

फोटो ओळी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील मालन पोवार यांना जीवनावश्यक भेटवस्तू प्रदान करताना महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद माने, कनिष्ठ अभियंता श्रुती वैद्य उपस्थित होत्या.

Web Title: Electricity bills paid by beggars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.