राज्यातील रिवायडिंग उद्योगाला २ रुपयांची वीज दर सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:49+5:302021-08-12T04:29:49+5:30
इचलकरंजी : यार्न रिवायडिंग उद्योगास प्रतियुनिट दोन रुपयांची वीज सवलत देण्याची घोषणा वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंत्रालयातील बैठकीत ...
इचलकरंजी : यार्न रिवायडिंग उद्योगास प्रतियुनिट दोन रुपयांची वीज सवलत देण्याची घोषणा वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंत्रालयातील बैठकीत केली. यामुळे वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या रिवायडिंग उद्योगाला प्रथमच वीज दरात सवलत मिळाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती नगरसेवक मदन कारंडे यांनी दिली.
वस्त्रोद्योगातील अनेक घटकांना वीज दरातील सवलत मिळते; परंतु यार्न रिवायडिंग वीज दर सवलतीपासून वंचित होता. दर आकारणी वाणिज्य दराने होत असल्याने हा उद्योग अडचणीत होता. त्यासाठी यार्न वायडिंग असोसिएशनने राष्ट्रवादीचे नगरसेवक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे वस्त्रोदयोगातील इतर घटकांप्रमाणे वीज दर सवलत मिळण्याची मागणी केली होती. यासंदर्भात वस्त्रोद्योगाशी संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यानंतर प्रतियुनिट २ दोन रुपये वीज दर सवलतीची तत्काळ अमंलबजावणी करण्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. बैठकीस अमित गाताडे, राजेंद्र पारीक, सुनील शिंदे, सचिन पाटील, सोमनाथ टकले व वायडिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.