चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:34 AM2018-02-16T00:34:09+5:302018-02-16T00:38:04+5:30

सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईलासामोरे जाणाºया चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

Electricity supply disrupts for quarrels on the Chikotra river; Gram Panchayat's tiredness while supplying water | चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

googlenewsNext

शशिकांत भोसले।

सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चिकोत्रा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर महावितरणपाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू केली जाते; पण हा उपसाबंदीचा आदेश झुगारून स्वत:ला बागायत शेतकरी समजणारे काहीजण राजरोसपणे विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत. परिणामी सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे.
चिकोत्रा खोऱ्यातील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनत चालला असून, चिकोत्रा प्रकल्पात होणाराकमी पाणीसाठा हे त्याचे प्रमुखकारण आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यापासून फक्त दोनचवेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.चिकोत्रा प्रकल्प परिसरात असणारे पावसाचे अल्प प्रमाण व धरण क्षेत्रात येणाºया पाण्याचे कमी स्रोत यामुळे हा प्रकल्प जास्तीत जास्त ६५ ते ७० टक्केच भरतो. पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याचीगरज आहे; पण राजकीय पातळीवरून अथवा प्रशासनाकडून तशीभरीव हालचाल होत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जनतेला सातत्याने मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

1 प्रकल्पात असणारा अत्यल्प पाणीसाठा व पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेले भरमसाट पाणी परवाने यामुळे या खोºयाचा पाणीप्रश्न येथूनपुढे भीषण होणार आहे.
2 काही शेतकरी तर अनधिकृतपणे थेट पाणी उपसा करत आहेत. ज्यावेळी कारवाई करायची वेळ येते, त्यावेळी पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. यामुळेच अशा शेतकºयांचे फावत आहे.
3 पाटबंधारे व महावितरणच्या अधिकाºयांनी समन्वयाने योग्य नियोजन केले तर सुरळीत पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना शक्य आहे, अन्यथा चिकोत्रा नदीकाठावरील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर होणार आहे.

महावितरणकडून दुर्लक्ष : बेसुमार पाणी उपसा
चिकोत्रा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसांत नदीपात्र कोरडे पडते. यावरून पाणी किती मोठ्या प्रमाणात उपसा होते याची कल्पना येते. काही हुशार बागायत शेतकरी तर पाणी नदीपात्रात आलेले पाहताच उपसाबंदी झुगारून राजरोसपणे दिवसाढवळ्या आकडे टाकून बेसुमार पाणी उपसा करत आहेत. अशा काही शेतकºयांना पाटबंधारे व महावितरणच्या संबंधितांकडून कायम अभय मिळत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.

आता थेट अशा अधिकाºयांवर मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत. आजपर्यंत बेकायदा पाणी उपसा करणारे अनेक मोटारपंप ग्रामस्थांनी दाखवून दिले; पण कोणतीही कारवाई न करता सोडल्यामुळे असे शेतकरी राजरोसपणे आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत.

Web Title: Electricity supply disrupts for quarrels on the Chikotra river; Gram Panchayat's tiredness while supplying water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.